By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 16, 2019 08:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट सोशल मीडियावर सक्रिय असतात. यावेळी महेश यांनी त्यांच्या २१ वर्ष जुन्या सिनेमाची आठवण काढत एक ट्वीट केलं. यात त्यांनी मोदी सरकारची कानउघडणी केली.
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक म्हणजे 'जख्म'. १५ डिसेंबरला या सिनेमाला प्रदर्शित होऊन २१ वर्ष पूर्ण झाली. याचसंबंधी भट्टांनी एक ट्वीट करत त्यांनी सिनेमातला प्रसिद्ध संवाद शेअर केला.
“MA aur Mulkh badle nahin jate. “ This semi- autobiographical film of mine released today 21 yrs ago.Ajay Devgan won his first National Award for it. It also won the Nargis Dutt award for best feature film on National Integration. It was the NDA Govt which honoured us pic.twitter.com/dQ3JKl4EVi
— Mahesh Bhatt (@MaheshNBhatt) December 15, 2019
त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, 'आई आणि देश बदलता येत नाही. माझा हा सेमी ऑटोबायोग्राफीकल सिनेमा प्रदर्शित होऊन २१ वर्ष झाली. अजय देवगणला या सिनेमासाठी त्याच्या आयुष्यातील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या सिनेमाने सर्वोत्तम फिचर फिल्मचा नर्गिस दत्त पुरस्कारही मिळवला होता. हे एनडीए सरकार होते ज्यांनी आमचा सन्मान केला होता.'
मुंबई - अभिनेत्री मलायका अरोरा व अरबाज खान दोन वर्षांपूर्वीच विभक्त झाले. पण....
अधिक वाचा