By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 16, 2019 06:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - अभिनेत्री मलायका अरोरा व अरबाज खान दोन वर्षांपूर्वीच विभक्त झाले. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने हे दोघं नेहमीच चर्चेत असतात. अरबाजमुळे मलायका व सुपरमॉडेल उज्ज्वला राऊत यांच्यात भांडण होत असल्याचं म्हटलं जात आहे. यामागचं कारण अरबाज आणि उज्ज्वला यांच्यात सोशल मीडियावर होणारा संवाद आहे असं सांगितलं जात आहे.
‘सुपरमॉडेल ऑफ द इअर’ या रिअॅलिटी शोच्या नव्या सिझनमध्ये मलायका परीक्षक म्हणून काम करत आहेत. याच शोमध्ये उज्ज्वला मेंटर म्हणून सहभागी झाली आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, या शोच्या सेटवरील लोकांना उज्ज्वला तिचे अरबाजसोबतचे चॅट्स दाखवत असते.
कशाप्रकारे अरबाज तिच्याशी चॅट करतो आणि ते दोघं एकमेकांना फोटोसुद्धा पाठवतात, हे सर्व उज्ज्वला सेटवरील इतर लोकांना दाखवत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच मलायका व उज्ज्वला यांच्यात सेटवर शीतयुद्ध सुरू आहे. मलायका व उज्ज्वला यांच्यातील वादामुळे शोटी टीम दोघांना वेगवेगळं ठेवून शूट पूर्ण करत असल्याचंही वृत्त आहे.
दरम्यान, घटस्फोटानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे तर जॉर्जिया ही अरबाजची गर्लफ्रेंड आहे. मलायका आणि अर्जुनचं नातंसुद्धा चांगलंच चर्चेत असतं. सोशल मीडियावरही हे दोघं एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात.
मुंबई – बॉलीवुड अभिनेत्री पायल रोहतगीला राजस्थान पोलिसांनी ....
अधिक वाचा