ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मलालाची जीवनगाथा ‘गुल मकई’ ३१ जानेवारीला रिलीज होणार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 22, 2020 06:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मलालाची जीवनगाथा ‘गुल मकई’ ३१ जानेवारीला रिलीज होणार

शहर : देश

       संपूर्ण जगात चर्चा झालेल्या तसेच २०१४ मधील नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मलाला युसुफजईच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सगळीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे नाव ‘गुल मकई’ असे आहे. या चित्रपटात मलाला यांची मुख्य भूमिका अभिनेत्री रीम शेख हीने साकारली आहे. तसेच दिव्या दत्ता, पंकज त्रिपाठी, अतुल कुलकर्णी, मुकेश ऋषि यांच्या महत्वाच्या भूमिका या चित्रपटा असणार आहेत.    


         ‘गुल मकई’चे दिग्दर्शक एचई अमजद खान असून निर्मितीकार संजय सिंगल आहेत. तालिबानने २००९ मध्ये पाकिस्तानातील स्वात घाटीवर ताबा मिळवला होता. आणि तेथील लोकांवर शरिया कानून लागू केला होता. त्यानंतर, कशा प्रकारे मलाला यांनी त्याविरोधात संघर्ष उभा केला, याचे चित्रण या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मलाला युसुफजई सामाजिक कार्यकर्त्या आहेत. लहानपणापासून महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी जागृती केली आहे. मलाला यांच्यावर २०१२ मध्ये तालिबान्यांनी गोळीबार केला होता. तसेच त्यानंतर तिच्यावर ब्रिटनमध्ये उपचार करण्यात आले.  


        दरम्यान, या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री रीम शेख ही टिकटॉक क्वीन आहे. ती छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा मानली जाते. तिने वयाच्या ६ व्या वर्षापासून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘देवी – नीर भरे तेरे नैना’ या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. या भूमिकेसाठी तिला २०१० मध्ये ‘न्यू टॅलेंट’ पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच ती ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ या टीव्ही मालिकेमधून घराघरात पोहचली. ‘तू आशिकी’,’तुझसे है राब्ता’, या मालिकांमध्येही तिने प्रमुख भूमिका साकारली आहे. रीम साठी ‘गुल मकई’ हा पहिलाच चित्रपट असून हा चित्रपट येत्या ३१ जानेवारीला रिलीज होणार आहे. 

मागे

राजमाता ‘जिजाऊंची यशोगाथा... 'जिऊ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला  
राजमाता ‘जिजाऊंची यशोगाथा... 'जिऊ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला  

      हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबा....

अधिक वाचा

पुढे  

सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर 
सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर 

            नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र स....

Read more