By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 03:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : adoor
सुपरस्टार चिरंजीवीचा 151 वा सिनेमा असलेल्या आज पहाटे सेटला आग लागल्याची घटना घडली. या ऐतिहासिक सिनेमाचं शूटिंग गेल्या वर्षभराहून अधिक काळ सुरू आहे. हैदराबाद येथील कोकापेट येथे या सिनेमाचा भव्य दिव्य सेट उभारला होता. या ठिकाणी चिरंजीवीचं फार्महाऊस देखील आहे. सिनेमाच्या सेटवरील 2 कोटींची मालमत्ता या आगीत जळून खाक झाली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या सिनेमाचं बजेट 300 कोटींचं आहे. येथे एका राजाच्या राज्याचा सेट उभारण्यात आला होता. ही जागा चिरंजीवीच्याच मालकीची आहे. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सिनेमात अभिनेते अमिताभ बच्चन यांचीही विशेष भूमिका आहे. आगीच्या घटनेमुळे अमिताभ बच्चन यांनी त्यांचं शूटिंग लांबणीवर टाकलं आहे. ’सई रा...’ सिनेमाची कथा रायलसीमेत ब्रिटिशांविरोधात लढलेल्या एका बंडखोर नेत्याची कथा आहे. अमित त्रिवेदींनी या सिनेमाला संगीत दिलं आहे.
शाहरुख आणि गौरी यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. दोघाचं भ....
अधिक वाचा