ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Mayuri Deshmukh | "आशुडा, अनेक प्रश्न अनुत्तरीत सोडलेस..." मयुरी देशमुखकडून भावनांना वाट मोकळी

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2020 11:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Mayuri Deshmukh |

शहर : मुंबई

अभिनेता आशुतोष भाकरे याच्या अकाली निधनानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री मयुरी देशमुख पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. आशुतोषच्या जन्मदिनी (11 ऑगस्ट) केकचा फोटो शेअर करत मयुरीने भावनांना वाट मोकळी करुन दिली.

काय आहे मयुरीची इन्स्टाग्राम पोस्ट?

आशुडा, तुझ्या वाढदिवशी सर्वोत्तम केक तयार करता यावा, केवळ यासाठी मी लॉकडाऊनच्या काळात 30 केक बेक केले. त्या सर्व 30 केक्सची पहिली चव तू चाखली होतीस, पण हा 30 वाढदिवस आधीच साजरे करण्याची ही तुझी पद्धत होती का? आपल्या प्रियजनांसाठी तू बरेच प्रश्न अनुत्तरीत सोडले आहेस

आम्हाला माहित आहे की तू उचललेले पाऊल भ्याडपणातून नाही, तर असहाय्यतेमुळेच होते, जे नैराश्यासोबत झालेल्या तुझ्या दीर्घकालीन संघर्षातून आले. पण गुणी बाळ माझं ते, आपण त्याला पराभूत करण्याच्या अगदी जवळ आलो होतो आणि तू असे वेड्यासारखे कृत्य केलेस. थोडं आणखी थांबायची आवश्यकता होती.”

दररोज, प्रत्येक सेकंदाला, थोडासा जास्तीचा संयम, थोडेसे अधिक धैर्य आणि एक दीर्घ, निरोगी, आनंदी आयुष्य वाट पाहत होतं तुझीआपली

मला अर्ध्यावर सोडल्याबद्दल मी तुझ्यावर चिडावं की तू त्या वेळात माझा होतास याबद्दल कृतज्ञ असावं?? त्याने काय फरक पडतो? आता कशानेही काय फरक पडतो??

तुझ्या आत्म्याचा शांततेने प्रवास व्हावा आणि देवदूतांनी तुला योग्य मार्गदर्शन करावे, अशी प्रार्थना आम्ही सतत करत आहोतदेवदूतांचे ऐकआता नेहमीसारखा हट्टीपणा दाखवू नकोस.”

मी, अभि, मम्मी, पापा तुझ्यावर निरतिशय प्रेम करतो आणि तू आमच्यासोबत असताना आम्ही ते पुरेसे व्यक्त केले असेल, अशी आशा आहेइतक्या वेदना असूनही तू माझ्यावर खूप प्रेम केले आहेस, मीही तेच करत राहीन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझीच, #बायकोतुझीनवसाची

खुलता खळी खुलेनाया मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आणि अभिनेता आशुतोष भाकरेने 29 जुलैला नांदेडमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी मयुरीसोबत ना मतभेद होते, ना त्याला म्हणावी तशी आर्थिक चणचण होती. तरीही आशुतोषने स्वत:चं आयुष्य संपवल्याने, कुटुंबाला आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आशुतोषने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र त्याला नेमकं कोणतं नैराश्य होतं, याचा उलगडा पोलीस करत आहेत.

मागे

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती हिच्या याचिक....

अधिक वाचा

पुढे  

सलमान खानने दत्तक घेतलेल्या कोल्हापुरातील खिद्रापूरकरांना दिलेली कमिटमेंट अपूर्ण
सलमान खानने दत्तक घेतलेल्या कोल्हापुरातील खिद्रापूरकरांना दिलेली कमिटमेंट अपूर्ण

'एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, उसके बाद तो मैं खुद की भी नहीं सुनता' असं म्....

Read more