ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सैफच्या 'नागा' आणि रणवीरच्या 'खिलजी' चेहऱ्यामागे 'या' व्यक्तीचा हात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2019 02:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सैफच्या 'नागा' आणि रणवीरच्या 'खिलजी' चेहऱ्यामागे 'या' व्यक्तीचा हात

शहर : मुंबई

एका नागा साधूचा लूक हा कायमच वेगळा असतो. 'लाल कप्तान' सिनेमातील सैफ अली खानचा लूक अतिशय हटके आहे. सिनेमातील ट्रेलरने सैफ अली खानची भूमिका स्पष्ट केली आहे. यामधील सैफचा लूक हा त्याच्या भूमिकेला अधोरेखित करत आहे. हा सिनेमा 18 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सैफच्या 'नागा' साधूच्या भूमिकेमागे आणखी एका व्यक्तीची मेहनत आहे. आणि तो व्यक्ती म्हणजे दर्शन येवलेकर. दर्शनने या अगोदर 'पद्मावत' या सिनेमातील अलाउद्दीन खिलजीला म्हणजे रणवीर सिंहवर मेहनत घेतली आहे. 'पद्मावत'मध्ये खिलजीच्या रुपात रणवीर सिंह प्रेक्षकांना भरपूर आवडला. त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या लूकने देखील प्रेक्षकांच कौतुक मिळवलं होतं.

'लाल कप्तान'बाबत दर्शनने एक मुलाखत दिली. यामध्ये तो म्हणाला की,'नागा साधू हे सामान्य व्यक्ती असतात. ज्यांनी जीवनात सर्वच गोष्टींचा त्याग केलेला असतो. स्वतःला कायम राखेने माखवून ही व्यक्ती केस आणि दाढी कधीच कापत नाही.या नागा साधूंना बघून सिनेमाच्या 'नागा'साधूच्या लूकची प्रेरणा मिळाली.'पुढे दर्शन म्हणाला की, 'या लूककरता भरपूर मेहनत घ्यावी लागली आणि भरपूर वेळ देखील गेला. फर्स्ट लूक करण्याकरता दोन तास लागले. हा लूक फक्त दिग्दर्शक आणि निर्माता टीमलाच नाही तर सैफला देखील आवडला.' एवढंच नव्हे तर सगळ्यांना माहित होतं की, आपण जे करतोय ते सगळ्यांच्याच कम्फर्ट झोनच्या बाहेरचं आहे. दररोज मी नवीन लूक करायचो आणि त्यानंतर त्यामध्ये सूचनेनुसार बदल करायचो.

मागे

Bigg Boss वर बंदीचा सरकार करतंय विचार
Bigg Boss वर बंदीचा सरकार करतंय विचार

रिअलिटी शो 'बिग बॉस' हा टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो मानला जातो. या शोच्....

अधिक वाचा

पुढे  

मराठी चित्रपटाचा परदेशात डंका
मराठी चित्रपटाचा परदेशात डंका

'भावनेला भाषा नसते' अशा टॅगलाइन खाली साकारण्यात आलेल्या 'बाबा' या मराठ....

Read more