ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नाट्यगृह आता 'रिंगटोनमुक्त', मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 07, 2019 04:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नाट्यगृह आता 'रिंगटोनमुक्त', मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय

शहर : मुंबई

नाट्यगृहामध्ये मोबाईल सायलेंटवर ठेवण्याची सूचना वारंवार करुनही काही हेकेखोर प्रेक्षक बधत नसल्यामुळे मुंबई महापालिकेला रामबाण उपाय शोधावा लागला आहे. बीएमसीने नाट्यगृहांमध्ये मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

नाटकाचा प्रयोग सुरु असताना मोबाईल वाजल्यावरुन अभिनेता सुबोध भावे, सुमित राघवन यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त केली होती. प्रत्येक प्रयोगाच्या आधी प्रेक्षकांना मोबाईल सायलेंटवर किंवा स्विच्ड ऑफ करण्याची कळकळीची विनंती केली जाते. तरीही काही प्रेक्षक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे सर्वच प्रेक्षकांना फटका बसतो.

शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी काही महिन्यांपूर्वी ठरावाच्या सूचनेद्वारे नाट्यगृहात जॅमर बसवण्याची मागणी केली होती. अखेर, पालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या नाट्यगृहांमध्ये लवकरच मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.अनेक वेळा प्रयोग सुरु असताना मोबाईल वाजतो आणि प्रेक्षक नाटक सुरु असतानाच भोवतालची पर्वा करता मोबाईलवर मोठमोठ्याने बोलतात, असा अनुभव अनेक कलाकार सांगतात. या प्रकारामुळे कलाकारांचं लक्ष विचलित होतं. काही कलाकारांनी प्रयोग अर्ध्यावर थांबवण्याचा पवित्राही घेतला आहे.

मागे

लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलीचा बोल्ड अंदाज,लवकरच मराठी सिनेसृष्टीत करणार पदार्पण
लक्ष्मीकांत बेर्डेच्या मुलीचा बोल्ड अंदाज,लवकरच मराठी सिनेसृष्टीत करणार पदार्पण

लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नावं. मराठी सोबतच बॉलि....

अधिक वाचा

पुढे  

दक्षिण आफ्रिकेची 'जोजिबिनी टूंजी' हिने पटकवला 'मिस युनिव्हर्स २०१९' चा मान...
दक्षिण आफ्रिकेची 'जोजिबिनी टूंजी' हिने पटकवला 'मिस युनिव्हर्स २०१९' चा मान...

अटलांटा - अमेरिकेतील अटलांटामध्ये ६८ व्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धा संपन्....

Read more