ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कलाविश्वाला गटार म्हणणाऱ्यांना जया बच्चन यांनी खडसावलं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 15, 2020 12:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कलाविश्वाला गटार म्हणणाऱ्यांना जया बच्चन यांनी खडसावलं

शहर : मुंबई

बॉलिवूडची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर जया बच्चन यांनी कठोर शब्दांत टीका करत त्यांना खडे बोल सुनावले आहेत. राज्यसभेमध्ये मंगळवारी शून्य प्रहराच्या तासाला बोलत असताना त्यांनी बॉलिवूडर उठणाऱ्या टीकेच्या झोडीचा मुद्दा अधोरेखित केला. शिवाय सरकारला हिंदी कलासृष्टीच्या बाजूनं उभं राहण्याचं आवाहनही केलं.

ड्रग्ज मुद्द्यावरुन वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार आणि अभिनेता रवी किशन यांच्यावर नाव घेता निशाणा साधत काहीजण खाल्लेल्या थाळीतच छेद करतात अशा आशयाचं वक्तव्य केलं. देशात अमेक समस्या समोर आलेल्या असताना त्यावेळीसुद्धा बॉलिवूड कलाकार मदतीसाठी पुढं येतात. पण, ज्यावेळी कलाविश्वाचीच बदनामी करण्यात येते तेव्हा मात्र फार वेदना होतात अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कलाजगताशी संबंध असणारी मंडळीच त्याविरुद्ध बोलत आहेत हे निंदनीय असल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या रवी किशन यांचा विरोध केला. अवघ्या काही लोकांसाठी साऱ्या बॉलिवूड जगतालाच बदनाम करणं योग्य नसेल असंही त्या म्हणाल्या.

'कलाविश्नाशी संलग्न व्यक्तींना सोशल मीडियावर फटकारलं जात आहे. या वर्तुळात नावारुपास आलेली लोकंच कलाविश्वाला गटार म्हणत आहेत. मी याच्याशी मुळीच सहमत नाही. मी आशा करते की सरकारडून अशा व्यक्तींना या शब्दांचा वापर करण्याबाबतची ताकीद देण्यात येईल', असं समाजवादी पक्षाच्या जया बच्चन राज्यसभेत म्हणाल्या.

मागे

'फार मोठी चूक करताय...', सुचक वक्तव्यासह कंगनानं मुंबई सोडली
'फार मोठी चूक करताय...', सुचक वक्तव्यासह कंगनानं मुंबई सोडली

मुंबईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री Kangana Ranaut  कंगना राणौत ह....

अधिक वाचा

पुढे  

कंगना रनौतचा मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटींचा दावा!
कंगना रनौतचा मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटींचा दावा!

अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटी रुपयांचा दावा केल....

Read more