By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 04:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेता आमिर खान हा बॉलिवूडमधे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून आमिर खान पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून, वॉटर कप स्पर्धेद्वारे महाराष्ट्रातील दुष्काळाविरोधात लढण्याचं काम करतो आहे. गेल्या ४ वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाला हरवत जलसंधारणाचं काम आमिर खान आणि त्याची संस्था करत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये दुष्काळाचा प्रश्न काही प्रमाणात का होईना कमी झाला आहे. आमिरने आपल्या अनेक बॉलिवूड सहकाऱ्यांना या जलसंधारणाच्या कामात सहभागी करुन घेतलं आहे. आमिर आणि त्याची पत्नी किरण राव हे झी मराठीवर तुफान आलया या कार्यक्रमाद्वारे, दुष्काळावर मात करुन जलसंधारणाचं काम केलेल्या गावांची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमिर खानने मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षितला आवाहन केलं होतं. आमिरच्या या आवाहानला प्रतिसाद देत माधुरीनेही या कार्यक्रमात सहभाग घेतला. आमिरने आपल्या ट्विटर हँडलवरुन माधुरीचे आभार मानत या कार्य्रक्रमाची लिंक शेअर केलीय.
अभिनेता अक्षय कुमारने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखती घेतली आहे. ....
अधिक वाचा