By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 05:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
या सिनेमातून सलमान पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात पाहायला मिळणार आहे. मात्र या सिनेमातून सलमानचा एक सरप्राइझ अवतारही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अॅक्शन व्यतिरिक्त आयटम नंबर करतानाही दिसणार आहे. याआधी सलमाननं या सिनेमात गायकाची भूमिकाही पार पाडली आहे. त्यानंतर आता या सिनेमातील आयटम साँगही सलमानच करणारं असल्याचं बोललं जात आहे. सलमानच्या दंबग सीरिजमधील हा तिसरा सिनेमा आहे आणि या सिनेमात सर्वात पहिल्या ’दबंग’मधील ’मुन्नी बदनाम हुई...’ हे गाणं रिक्रिएट करण्यात येणारं असून या गाण्यात अनेक मोठे बदल केले जाणार आहे. या गाण्याचे बोल बदलून ’मुन्नी बदनाम’च्या जागेवर ’मुन्ना बदनाम हुआ...’ असं केलं जाणारं आहे. तसेच यात आयटम गर्ल ऐवजी आयटम बॉयची एंट्री होणार आहे. याची सर्व तयारीही निर्मात्यांकडून झाली असून हे गाणं सलमान खानवर हे गाणं चित्रीत केलं जाणारं आहे. सलमान पोलिस ऑफिसर बनण्याअगोदर कॉलेज स्टुडंटच्या भूमिकेत दिसणार असून त्याचवेळी हे गाणं शूट केलं जाणार आहे. असा सिक्वेंस ’दबंग 3’मध्ये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता मलयकाच्या आयटम नंबरवर डान्स करणारा सलमान प्रेक्षकांच्या पसंतीत कितपत उतरतो हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
सेक्रेड गेम्स या वेबसीरिजनंतर नवाजुद्दीन सिद्धीकी, कल्की कोचलीन, सैफ अली ख....
अधिक वाचा