By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2019 01:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार मोहम्मद झहुर खय्याम यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती अधिकच खालावली. शेवटी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अशी माहिती प्रसिद्ध गझल गायक तलत अझीज यांनी दिली. त्यांच्या निधनाने सुरेल मैफलीचे शेवट झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे .
खय्याम यांनी आखरी खत, कभी-कभी, बाजार, उमराव जान आणि यात्रा सारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिले. त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 2007 मध्ये संगीत नाटक अकादमी तर 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
संगीत विश्व आणि खय्याम यांचं वेगळच नात होतं. वयाच्या सतराव्या वर्षी लुढियाणामध्ये त्यांनी करिअरची सुरुवात केली. 1953 मध्ये प्रदर्शित झालेला 'फुटपाथ' यांचे सिनेमाचे संगीतकार म्हणून त्यांच बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले. 1961 च्या 'शोला आणि शबनम' या सिनेमातून खय्याम यांना वेगळी ओळख मिळाली. खय्याम यांच्या पत्नीने नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी एक ट्रस्ट स्थापना केली होती. या ट्रस्टच्या कार्यासाठी वयाच्या 90 व्या वर्षी आपली दहा कोटींची संपूर्ण संपत्ती दान केली.
मधुबन चित्रपटगृहात 'मिशन मंगल' हा सिनेमा सुरू असतानाच या चित्रपटाच्या पी....
अधिक वाचा