By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 12, 2019 06:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या बहुचर्चित ठरलेल्या चित्रपटातलं ‘शंकरा रे शंकरा’ हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्यानंतर आता या चित्रपटातलं दुसरं गाणंही प्रदर्शित झालं आहे. ‘माय भवानी’ असे या गाण्याचे बोल असून यात अभिनेता अजय देवगण आणि काजोलने ठेका धरला आहे.
या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर भव्यदिव्य स्वरुपात पाहायला मिळणार आहे. यामध्ये अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे.
या गाण्यामध्ये भवानी मातेचं महात्म्य सांगितलं असून तिचं कौतुक केलं आहे. तसंच देवीच्या स्तुतीमध्ये तान्हाजी, त्यांच्या पत्नी आणि सारेच मावळे रंगून गेल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या गाण्यात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेची देखील झळकला आहे. हा चित्रपट प्रेसक्षकांना नवीन वर्षाच्या सुरुवारतीलाच भेटीला येणार आहे.
आता प्रत्येक व्यक्ती ‘गुगल सर्च’कडेच धाव घेत आहे. मनोरंजनपासून अगदी विज....
अधिक वाचा