By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 05:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनच्या फार्म हाऊसवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तेलंगांनातील महबूबनगर जिल्ह्यातील पापीरेड्डीगुडा गावात नागार्जुनचे 40 एकर परिसरावर फार्महाऊस आहे. या फार्महाऊस शेजारील एका बंदिस्त खोलीत अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळला. या मानवी सांगड्यावर फूल स्लीव्ह शर्ट, आणि पॅंन्ट आहे. त्यावरुन हा मृतदेह एखाद्या अधिकार्याचा असावा असा कयास आहे. मात्र या ठिकाणी नागार्जुन फारसा येत जात नाही असेही समजते.
दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.
प्रसिद्ध गायक अदनान सामीने 2003 मध्ये पाकिस्तानचं नागरिकत्व असताना मुंबईत 8 फ....
अधिक वाचा