By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 03:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सोनी कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तर, मराठीवर येणाऱ्या कोण होणार करोडपती? या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवलं आहे. आपल्या आयुष्याची वाट चालताना अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं कळत-नकळत शोधत असतो. ज्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो, अशा प्रश्नांची उत्तरं सापडली की आयुष्याला एक वेगळंच वळण लागतं. असेच काहीसे प्रश्न सोनी मराठीवर येणाऱ्या कोण होणार करोडपती? या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या, तुमची स्वप्न पूर्ण करायला मदतीचा हात देणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची हीच खरी वेळ असल्याचं नागराज मंजुळे नुकत्याच लाँच झालेल्या गाण्यातून सांगत आहेत.
या गाण्याची गंमत म्हणजे कोलंबस आणि गणपत वाणी या दोन भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्तींचा उल्लेख रंगा गोडबोले यांनी खूप सुंदररित्या केला आहे. असून याला आवाज ही दिला आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ए. व्ही. प्रफुलचंद्रसोबत नागराज मंजुळेंनी हीकागर, नाळसारख्या चित्रपटांना संगीत देणाऱ्या नव्या दमाच्या ए. व्ही. प्रफुलचंद्र यांनी हे गाणं संगीतबध्द केलं या गाण्याला आवाज दिला आहे. त्यामुळे यंदाच्या कोण होणार करोडपती? मधून नागराजच्या चाहत्यांना त्याचे दोन नवे पैलू पाहायला मिळतील, असं म्हणायला हरकत नाही.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांच्या आगामी दरबार या चित्रपटाच्....
अधिक वाचा