By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 08, 2020 02:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अमर देवकर दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘म्होरक्या’ला महाराष्ट्रात एकही थिएटर नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे . अनंत अडचणींवर मात करुन ‘म्होरक्या’ चित्रपट 7 फेब्रुवारीला म्हणजेच आज प्रदर्शित होत आहे. पण राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाला कुणी थिएटर देता का थिएटर म्हणण्याची वेळ आली आहे . निर्माता आणि प्रेझेंटर यांच्यातील वाद आणि समन्वयाअभावी म्होरक्याला थिएटर मिळाले नाही, असा आरोप आहे.
निर्माता आणि प्रेझेंटर यांच्यातील वाद आणि समन्वयाअभावी म्होरक्याला थिएटर मिळाले नाही, असं म्हटलं जात आहे. सगळ्या थिएटरला डीसी गुरुवारी गेल्यामुळे म्होरक्याला थिएटर मिळालं नाही. नियमानुसार, डीसी बुधवारी पोहोचायला हवी होती. मात्र, निर्मात्याने हलगर्जीपणा केल्यामुळे हा गोंधळ झाल्याचा आरोप दिग्दर्शकाने केला आहे. म्होरक्याला महाराष्ट्रात शनिवारी एकूण 35 शो मिळण्याची शक्यता आहे.दुसरीकडे, चार मराठी, तीन हिंदी, इतर भाषेतील काही चित्रपट याच आठवड्यात प्रदर्शित होत आहेत. तसेच, तान्हाजी आणि स्ट्रीट डान्सर हे चित्रपट अजूनही सिनेमागृहांमध्ये तग धरुन आहेत. त्यामुळे म्होरक्याच्या शोवर गदा आली आहे, असंही म्हटलं जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतके शो या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाला मिळाले आहेत. ही मोठी शोकांतिका आहे.
मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात शो न मिळण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही ‘आणि… डॉ. काशीनाथ घाणेकर’, ‘भाई’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘नशीबवान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठीही निर्माता-दिग्दर्शकांना झगडावं लागत होतं.
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र स....
अधिक वाचा