ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अर्जुन कपूरकडून गृहिणींना मिळणार नवीन वर्षाचे अनोखे गिफ्ट, तुम्हीच पहा...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 07:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अर्जुन कपूरकडून गृहिणींना मिळणार नवीन वर्षाचे अनोखे गिफ्ट, तुम्हीच पहा...

शहर : देश

                अर्जुन कपूर आपल्या अभिनयाच्या जोरावर चांगलाच प्रसिद्ध आहे. नुकताच अर्जुन कपूरचा ‘पानिपत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांनी चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र आता अर्जुन अभिनयासोबतच व्यवसाय करणार असल्याचे कळाले आहे. त्याने घरगुती खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपनीची स्थापन केली असून या कंपनीचे नाव ‘फूडक्लाउड’ असे ठेवण्यात आले आहे. 

               ही एक स्टार्ट-अप कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून देशातील चार हजाराहून अधिक गृहिणींना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. व हेच महिलांसाठी नवीन वर्षाचे अनोखे गिफ्ट ठरणार आहे. त्यासाठी अर्जुन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो आहे. ही कंपनी सुग्रास स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींचा मागोवा घेणार आहे. त्यानंतर त्यांना व्यावसायिक म्हणून समोर येण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन देणार आहे. या घोषणेनंतर दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरातील चार हजारहून अधिक महिलांचा प्रतिसाद मिळाला आहे. या महिलांनी आपलं स्वप्न साकार करण्यासाठी छोटे उद्योग सुरुही केले आहेत.

              ‘मला असे वाटते की हे वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी व्यासपीठ एक भरभक्कम सामाजिक हेतू साध्य करू शकेल आणि गृहिणींना सक्षम करण्यासाठी तसेच त्यांना स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी किंवा त्यांच्या एकूण कुटुंब उत्पन्नात भर घालण्यासाठी कामी येईल. माझ्या दृष्टीने स्वाभिमान आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टीने ही मोठी झेप ठरेल आजवर मला मिळालेल्या प्रतिसादाने मी आनंदी आहे.

             दरम्यान, माझी टीम अजूनही विविध शहरामधील सर्वोत्तम सुगरण गृहिणींचा शोध घेऊन त्यांना या व्यासपीठावर आणत असल्याचं अर्जुनने म्हटलं आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरानंतर कंपनीने आता सहा नव्या शहरांमध्ये विस्तार करण्याची योजना आखली आहे.

मागे

बाजीप्रभू देशपांडेंच्या अमर बलिदानाची गाथा रुपेरी पडद्यावर
बाजीप्रभू देशपांडेंच्या अमर बलिदानाची गाथा रुपेरी पडद्यावर

                  मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर यो....

अधिक वाचा

पुढे  

ब्रिटिश अॅसिड अटॅक सर्वायव्हर केटी पायपरने केले 'छपाक' चे कौतुक, म्हणाली…
ब्रिटिश अॅसिड अटॅक सर्वायव्हर केटी पायपरने केले 'छपाक' चे कौतुक, म्हणाली…

अॅसिड अटॅक सर्वायव्हर मालतीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'छपाक'चा ट्रे....

Read more