By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2020 09:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय आहे. नोराची डान्स स्टाईल आणि तिच्या हटके अदाकारिने सगळ्यांनाच भूरळ घातली आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ (India’s Best Dancer) या रिअॅलिटी शोमध्ये आल्यानंतर तिच्या डान्सच्या व्हिडीओंची (Nora Fatehi Dance Video) धूम सुरू आहे.
फक्त व्हीडिओच नाही तर नोरा तिच्या चाहत्यांसाठी हॉट फोटोही (Nora Fatehi Photo) नेहमी शेअर करत असते. पण इन्स्टाग्रामवर तिने ठेवलेल्या DP मुळे सगळेच आर्श्चयचकित झाले आहे. नोराने ठेवलेला डीपी पाहून हे काय आहे? असाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. तिने ठेवलेल्या फोटोवर चाहते वारंवार प्रश्न विचारत आहेत.
खरंतर, नोरा फतेहीने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा प्रोफाइल फोटो बदलला आहे. यामध्ये तिने स्वत:चा फोटो काढून एक विचित्रच फोटो ठेवला आहे. हा फोटो एका रोबोटचा असल्याचं वाटत आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रश्नांचा भडिमार केल्याचं पाहायला मिळालं.
या फोटोसोबतच नोराने तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्येही काहीतरी विचित्र लिहलं आहे, जे लोकांच्या समजण्यापलिकडे आहे. ‘Obbdi Nfsj Sboj 20.10.20.’ असं काहीतरी नोहाने तिच्या बायोमध्ये लिहलं आहे. हे पाहिल्यानंतर नेमकं काय लिहलं आहे असा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. आता यात विशेष बाब म्हणजे प्रसिद्ध गायक गुरू रंधावा आणि संगीत कंपनी टी-सीरीजनेही हेच चित्र त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ठेवलं आहे.
आता याचं काही कनेक्शन जोडायचं झालं तर 20.10.20 ला नोरा आणि गुरू रंधावा याचं ‘नाच मेरी राणी’ हे गाणं रिलीज होणार आहे. त्यामुळे हे त्याचे काही संकेत असून पब्लिसिटी स्टंट असल्याचंही नेटकरी म्हणाले.
‘ऑस्कर’ जिंकण्याचे भारताचे स्वप्न पहिल्यांदा पूर्ण करणाऱ्या प्रख्यात ....
अधिक वाचा