ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अनुरागबद्दल बोलायला ६ वर्ष का लागली ? पायल घोष म्हणते...

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2020 02:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अनुरागबद्दल बोलायला ६ वर्ष का लागली ? पायल घोष म्हणते...

शहर : मुंबई

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. यानंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु झालीय. अभिनेत्री कंगना राणौतने अनुरागच्या अटकेची मागणी केलीय. अनुराग कश्यपने माझ्यावर जबरदस्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती की त्यांनी यावर कारवाई करायला हवी. ज्यामुळे देशासमोर सत्य येईल. हे बोलणं माझ्यासाठी नुकसान देणार आहे. माझी सुरक्षा धोक्यात आहे. कृपया माझी मदत करा असं तिने म्हटलंयदरम्यान पायल घोष इतके दिवस गप्प का बसली ? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय.

मी अनेकदा यासंदर्भात ट्वीट केलं आणि डिलीट केलं. ट्वीट डिलीट कर असे माझ्या मॅनेजरने भावाला सांगितले. हे सारे माझे हितचिंतक आहेत. माझी फॅमिली संकुचित आहे. ती मला सपोर्ट करणार नाही. हे सर्व सोड आणि घरी चल असे ते म्हणतील. पण अनुरागने मला सॉरी म्हटलं असत तर बरं झालं असतं.

कोणाची हिम्मत होत नाही हे बोलण्याची. मला हे बोलायला वर्ष लागली. बॉलीवुडमध्ये सर्वजण वाईट नसतात. सर्वजण ड्रग्ज घेतात असं नाही पण कोणीच ड्रग्ज घेत नाही असेही नाही.

महिला आयोग साथीला

पायल घोषच्या साथीला राष्ट्रीय महिला आयोग धावली आहे. काल रात्री पायल घोषने ट्वीट करत २०१५ साली अनुराग कश्यपने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले. जर ती तक्रार करणार असेल तर महिला आयोग तिच्यासोबत आहे असे अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटलंय. पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात केस दाखल केलेली नाही. परंतु राष्ट्रीय महिला आयोगच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी पायलकडे याबाबत संपूर्ण माहिती मागितली आहे. ज्याद्वारे त्या या प्रकरणात कारवाई करु शकतील.

अनुराग कश्यपवरील आरोपांनंतर कंगनाने पायलच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. कंगनाने #MeToo हा हॅशटॅग वापरत, अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी केली आहे. यापूर्वीही सुशांत प्रकरणावरुन कंगना आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटरवॉर पाहायला मिळाला होता.

 

 

मागे

आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या; तिघांना अटक
आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या; तिघांना अटक

गेल्या काही महिन्यांपासून कलाकारांच्या आत्महत्यांचं सत्र काही केल्या कमी....

अधिक वाचा

पुढे  

'संपूर्ण महाराष्ट्र ढासळतोय, पण सरकार माझ्याशी वाद घालण्यात मग्न'
'संपूर्ण महाराष्ट्र ढासळतोय, पण सरकार माझ्याशी वाद घालण्यात मग्न'

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आणि मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ....

Read more