By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 18, 2020 02:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
‘बाहुबली’ अभिनेता प्रभास आता मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत काम करणार आहे. ‘लोकमान्य’ ते ‘तानाजी’ असे विविधांगी चित्रपट साकारणाऱ्या ओम राऊत याच्यासोबत प्रभास नवीन चित्रपट करत आहे. ‘आदिपुरुष’ या सिनेमाची आज घोषणा करण्यात आली.
अजय देवगनसोबत ‘तानाजी’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यावर ओम राऊत आता ‘बाहुबली’ स्टार प्रभाससोबत काम करणार आहे. ओम राऊत आणि प्रभास यांनी मंगळवारी सकाळी 7 वाजून 11 मिनिटांच्या मुहूर्तावर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत ‘आदिपुरुष’ची अधिकृत घोषणा केली.
अभिनेता प्रभास ‘आदिपुरुष’ची मुख्य भूमिका साकारणार असल्याचे पोस्टरमध्ये म्हटले आहे. टी सीरीजचे भूषण कुमार या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार असून हिंदीशिवाय तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या चार दाक्षिणात्य भाषांमध्ये रिलीज होईल.
अभिनेता प्रभास ‘आदिपुरुष’ची मुख्य भूमिका साकारणार असल्याचे पोस्टरमध्ये म्हटले आहे. टी सीरीजचे भूषण कुमार या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार असून हिं
ओम राऊतचा परिचय
लेखक-दिग्दर्शक ओम राऊत हा प्रख्यात निर्मात्या नीना राऊत आणि ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांचा चिरंजीव. लहानपणी करामती कोट (1993) या सिनेमात त्याने अभिनय केला होता. ‘सिटी ऑफ गोल्ड’ या सिनेमाच्या निर्मितीतून 2010 मध्ये त्याने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेल्या ‘लोकमान्य : एक युगपुरुष’ सिनेमाचे दिग्दर्शन त्याने केले. तर नुकत्याच आलेल्या अजय देवगणच्या ‘तान्हाजी’च्या दिग्दर्शनातून त्याने बॉलिवूडमध्येही ठसा उमटवला.
दुसरीकडे, प्रभास अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतही एका सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचे नाव ठरले नसून नाग अश्विन त्याचे दिग्दर्शन करणार आहे. तर अभिनेत्री पूजा हेगडेसोबत त्याचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.
चित्रपट जगतात काही आव्हानात्मक आणि तितक्याच रंजक कथानकांना हाताळत दर्जेद....
अधिक वाचा