By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 03:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
अनेक चाहते 'वंडर वुमन १९८४' या सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. डीसी कॉमिकचे प्रसिद्ध कॅरेक्टर वंडर वुमनवर आधारित 'वंडर वुमन १९८४' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
ट्रेलरमध्ये डायना प्रिन्स अर्थात वंडर वुमन आपल्या सुपर पॉवरने शत्रूंविरुद्ध लढताना दिसत आहे. या सिनेमात वंडर वूमन एक नवीन सुरुवात करताना दिसणार आहे. पण त्याआधी तिला पुन्हा एकदा तिच्या शक्तीचा वापर लोकांना वाचवण्यासाठी करावा लागणार आहे.
सिनेमा १९८४ च्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला आहे. सिनेमात भविष्य आणि वर्तमान याचा मेळ दाखवण्यात आला आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ॲक्शन, एनर्जीसह खुर्चीला खिळवून ठेवणारे काही स्टंटही आहेत. पुढच्या वर्षीच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे.
'वंडर वुमन १९८४' हा २०१७ मध्ये आलेल्या वंडर वुमनचा सीक्वल आहे. हॉलिवूडप्रमाणे भारतीय प्रेक्षकांनीही या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला होता. आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने तुफान कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले होते.
दीपिका पदुकोणचा बहुप्रतिक्षित छपाक सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर ....
अधिक वाचा