ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऑस्कर २०२० नामांकने जाहीर; 'जोकर' प्रथमस्थानी

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 14, 2020 06:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ऑस्कर २०२० नामांकने जाहीर; 'जोकर' प्रथमस्थानी

शहर : विदेश

             कॅलिफोर्निया : २०२० नवीन वर्षात ९२ व्या अकॅडमी अवॉर्डस म्हणजेच ऑस्कर पुरस्कारांची नामांकने नुकतीच जाहीर झाली आहेत. त्यामध्ये टोड फिलिप्स दिग्दर्शित जोकर चित्रपट स्पर्धेत प्रथम स्थानी  नामांकनांमध्ये आला आहे. जगभरातले चित्रपटप्रेमी या पुरस्कारांची वाट बघत आहेत. यावर्षी 'ऑस्कर पुरस्कारचे अवॉर्ड'स १० फेब्रुवारीला भारताच्या वेळेनुसार हा सोहळा पार पडणार आहे.

      जगातील सिनेमेप्रेमी या ऑस्करसाठी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया या ठिकाणी येतात. आपल्या चित्रपटातल्या चित्रामध्ये कसे रंग भरण्यात आले आहेत ते या ऑस्करच्या सहाय्याने समजणार आहे. यावर्षी क्विंटन टरँटिनोचा 'वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड' आणि टोड फिलिप्सचा 'जोकर' हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झाला असून ऑस्करच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहे.

       भारताकडून ऑस्करसाठी झोया अख्तरचा 'गली बॉय' सिनेमा पाठवण्यात आला होता मात्र, तो स्पर्धेबाहेर गेला आहे. भारताला पदार्पणासाठी अजून एक संधी मिळालेली आहे. विकास खन्ना यांचा 'द लास्ट कलर' हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेत्री नीना गुप्ता यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 

      दरम्यान, वेगवेगळ्या चित्रपटसृष्टीतून पाठवण्यात आलेले सर्वोत्तम सिनेमे, दिग्दर्शन, अभिनेता, संकलन, सिनेमॅटोग्राफी, अशा अनेक विभागांमधील नामांकनांमध्ये 'जोकर' चित्रपटाचा दबदबा वाढल्याचे चित्र दिसत आहे.  
 

मागे

...म्हणून दीपिकाच्या जाहिराती थांबविल्या
...म्हणून दीपिकाच्या जाहिराती थांबविल्या

       मुंबई - जाहिरात विश्वातील राणी आणि बॉलीवुड चित्रपटांमधून देश....

अधिक वाचा

पुढे  

नीना गुप्ताची इच्छा आहे की जर ती वेळेत परत आली तर ही एक गोष्ट बदलली पाहिजे
नीना गुप्ताची इच्छा आहे की जर ती वेळेत परत आली तर ही एक गोष्ट बदलली पाहिजे

नीना गुप्ता हे भारतीय चित्रपटात काम करणारे नाव आहे, मात्र वेळेत परत येऊ शकती....

Read more