By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 25, 2020 04:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते. यंदा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वाडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला. वाडकर म्हणाले, पद्मश्री मिळाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. मला गृहमंत्रालयाकडून फोन आला व मला फोनवर पुरस्कार मिळाल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, आशाताई, लतादीदी यांनी मला माझ्या करिअरमध्ये खूप मदत केली. मला हा पुरस्कार लतादीदी, आशाताई यांच्या आशीर्वादामुळेच मिळाला आहे, असंही ते म्हणाले. सुरेश वाडकर यांनी हिंदी आणि मराठीत शेकडो गाणी गायली आहेत. ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था, तू सप्तसूर माझे, सुरमयी अखियों मे, ऐ जिंदगी गले लगा ले, सपने में मिलती है यासारखी अनेक गाणी गाजलेली आहेत.
संपूर्ण जगात चर्चा झालेल्या तसेच २०१४ मधील नोबेल शांतता पुरस्का....
अधिक वाचा