By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 06, 2020 09:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) बलात्काराचा आरोप करणार्या अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ‘मला न्याय द्या’, अशी मागणी केली आहे. पायलने पुन्हा एकदा ट्विट करत अनुराग कश्यपवर आरोप केले आहेत. या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना टॅग केले आहे
या ट्विटमध्ये तिने म्हटले की, ‘माझ्या मित्राने आणि व्यवस्थापकाने अनुराग कश्यपला माझा चित्रपट (ओस्रावेली) संदर्भ म्हणून पहायला सांगितला होता. कारण भविष्यात आम्ही एक प्रोजेक्टवर काम करणार होतो. त्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही भेटणार देखील होतो. मात्र, अनुराग कश्यप यांनी कोणतेही सत्य विचारात न घेता माझे आणि सहकलाकार ज्युनिअर एनटीआर यांच्यातील संबंध खराब केले होते. मी अजूनही न्यायाची वाट पाहत आहे.’ या ट्विटमधून तिने पुन्हा एकदा न्यायाची मागणी केली आहे.
My friend and manager had asked Mr. Kashyap to see my film as a reference as we were supposed to meet for the discussion of a project. Mr. Kashyap maligned my relation with my costar without any truths..@narendramodi @HMOIndia @sharmarekha still waiting for Justice
मागे
जान कुमार सानूच्या माफीला काही अर्थ नाही, त्याने मराठीतून माफी मागायला हवी; अर्शी खानचा संताप
‘कलर्स’ वाहिनीच्या ‘बिग बॉस’ (Bigg Boss 14) या रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गाय....
अधिक वाचा