ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ट्वीटरवर पायल रोहतगीचा दीपिकावर निशाणा

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 06:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ट्वीटरवर पायल रोहतगीचा दीपिकावर निशाणा

शहर : मुंबई

      नवी दिल्ली - जेएनयूमध्ये  झालेल्या भीषण हल्ल्यातील झालेल्या जखमींची बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने भेट घेतली. परंतु त्यावर तिने कोणतंही वक्तव्य न करता ती थेट निघून गेली. दीपिका जेएनयूत पोहचल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जेएनयूत जाण्याच्या निर्णयाबाबत काहींनी दीपिकाला शूर म्हटलंय. तर काहींनी तिचं जेएनयूत जाणं एक पब्लिसिटी स्टंट किंवा प्रमोशनल फंडा असल्याचं म्हटलंय. अभिनेत्री पायल रोहतगीने दीपिकावर निशाणा साधत तिला ट्विटवर ट्विट करत इडियट असल्याचं म्हटलंय. 

      दरम्यान,  दीपिकाच्या वडिलांनी भारतासाठी गोल्ड मेडल जिंकले आहेत. तर दुसरीकडे दीपिका भारताला तोडणाऱ्यांसोबत उभी राहिली आहे. दीपिकाने ती आलिया भट्टची बेस्ट फ्रेन्ड असल्याचं दाखवून दिल्याचंही ती म्हणाली आहे. 'छपाक' दिग्दर्शिक मेघना गुलजार यांनी, जेएनयूत विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी दीपिकाचं ब्रेन वॉश केलं असल्याची टीकाही पायलने केली आहे. 

      दीपिकाच्या जेएनयू एन्ट्रीनंतर एकीकडे तिला शूरवान तर दुसरीकडे 'छपाक' बॉयकॉट करण्याची चर्चा ट्विटवर चालली आहे. तसेच बॉयकॉट छपाक हा हॅशटॅग ट्रेंड सुरु झाला. तर दीपिकाने केलेल्या सहभागासाठी काहींनी आय स्टॅन्ड विथ दीपिका हा हॅशटॅग ट्रेंड झाला. येत्या १० जानेवारी रोजी 'छपाक' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 


 

मागे

भारताचे राष्ट्रपती 'अब्दुल कलाम' यांच्यावर बायोपिक
भारताचे राष्ट्रपती 'अब्दुल कलाम' यांच्यावर बायोपिक

      मुंबई - चित्रपट सृष्टीत प्रदर्शित झालेल्या बर्याेच बायोपिकनंतर आत....

अधिक वाचा

पुढे  

‘शहीद भाई कोतवाल’चा ट्रेलर प्रदर्शित
‘शहीद भाई कोतवाल’चा ट्रेलर प्रदर्शित

           इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाची सुटका व्हावी यासाठी अनेक....

Read more