ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अंधेरीत उदयोन्मुख अभिनेत्रीची आत्महत्या

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 30, 2019 12:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अंधेरीत उदयोन्मुख अभिनेत्रीची आत्महत्या

शहर : मुंबई

अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील केनवूड सोसायटी इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारून पर्ल पंजाबी या उदयोन्मुख अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आईसोबत झालेल्या वादानंतर तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

केनवूड सोसायटीत राहणारी पर्ल पंजाबी चित्रपटसृष्टीत काम मिळविण्यासाठी धडपडत होती. तिचे आपल्या आईबरोबर पटत नव्हते, अशी चर्चा आहे. यापूर्वीही दोन वेळा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारल्याचे कळताच रहिवाशी तेथे गोळा झाले. त्यांनी जबर जखमी झालेल्या पर्लला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी ओशिवरा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मागे

'आरारारा.....खतरनाक' प्रवीण तरडे बचावले
'आरारारा.....खतरनाक' प्रवीण तरडे बचावले

'मुळशी पॅटर्न'  या गाजलेल्या चित्रपटाचे प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक प्रवी....

अधिक वाचा

पुढे  

 “साहो”
“साहो”

 अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला प्रभास आणि श्रद्धा कपुर चा मूवी ‘साहो&rsquo....

Read more