ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

“पीएम नरेंद्र मोदी” प्रदर्शनाचा मार्ग मोकळा,५ एप्रिलला होणार प्रदर्शीत

By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 01, 2019 07:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

“पीएम नरेंद्र मोदी” प्रदर्शनाचा मार्ग मोकळा,५ एप्रिलला होणार  प्रदर्शीत

शहर : मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘पीएम नरेंद्र मोदीचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका सोमवारी निकाली काढत हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शीत होणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

‘पीएम नरेंद्र मोदी चित्रपटात मोदींचा बालपणापासून ते पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉयने चित्रपटात मोदींची भूमिका साकारली आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शीत करण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादी, मनसे पक्षांनी केली असून या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी या राजकीय पक्षांद्वारे करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात ११ ते २९ एप्रिल दरम्यान चार टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या सिनेमाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्यात यावी, असे याचिकेत म्हटले आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली असून हा चित्रपट प्रदर्शनाची नियोजीत तारीख ५ एप्रिलला प्रदर्शीत होणार असल्याचे स्पष्ट केले.

मागे

'ग्रॅमी नॉमिनेटेड ' अमेरिकन रॅपरची भरदिवसा  हत्या
'ग्रॅमी नॉमिनेटेड ' अमेरिकन रॅपरची भरदिवसा हत्या

ग्रॅमी नॉमिनेटेड रॅपर निप्सी हसल याची रविवारी त्याच्या कपड्यांच्या स्टोअ....

अधिक वाचा

पुढे  

पीएम मोदींच्या बायोपिकला विरोध करण्यात वेळ का वाया घालवता?'- विवेक ओबेरॉय
पीएम मोदींच्या बायोपिकला विरोध करण्यात वेळ का वाया घालवता?'- विवेक ओबेरॉय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीवर आणि त्या....

Read more