By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 10:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
रुग्णवाहिका योग्य वेळेत पोहचण्यात अपयशी ठरल्यामुळे अभिनेत्री पूजा झुंझारला आणि तिच्या नवजात बाळाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. हिंगोलीत ही दुर्दैवी घटना घडलीय. या घटनेनंतर आरोग्य सेवेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
गोरेगावमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय पूजा झुंजार या अभिनेत्रीला प्रसुती कळा जाणवू लागल्या यानंतर तिला गोरेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. तिथे पूजाने बाळाला जन्म दिला परंतु पण काही वेळातच या नवजात बाळाचा अचानक मृत्यू झाला. नंतर पूजाची प्रकृती बिघडली. पूजा यांना पुढील उपचारांसाठी हिंगोलीमध्ये नेण्याचा सल्ला प्राथमिक उपचार केंद्रातील डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पूजाच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेची शोधा शोध सुरु केली. केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेचा शोध घेण्यास पूजा यांच्या नातेवाईकांनी सुरुवात केली व खासगी रुग्णवाहिका मिळाली. त्यानंतर पूजाला याच रुग्णवाहिकेतून हिंगोलीला नेण्यात आलं. पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. जर वेळेत पूजाला रुग्णवाहिका मिळाली असती तर तिचा जीव नक्कीच वाचू शकला असता असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पूजा यांनी ‘फाल्गुनराव जिंदाबाद’, ‘देवी माऊली आम्हा पावली’ या सिनेमांमध्ये काम केले आहे. पूजा या सिने निर्माते विष्णू झुंजार यांच्या पत्नी होत्या. गरोदरपणामुळे पूजाने कामातून ब्रेक घेतला होता. पूजाच्या मृत्यूमुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
रिअलिटी शो 'इंडियन आयडॉल'चा 11 वा सीझन लवकरच सुरू होत आहे. यावेळी या शोमध्ये....
अधिक वाचा