ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चर्चेत आलेल्या स्वानंदीच्या 'त्या' फोटोवर प्रिया बेर्डेंचा खुलासा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 02, 2021 07:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30

चर्चेत आलेल्या स्वानंदीच्या 'त्या' फोटोवर प्रिया बेर्डेंचा खुलासा

शहर : मुंबई

अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) आणि प्रिया बेर्डे (Priya Berde) यांची मुलगी स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde) हीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नसराईची लगबग आहेत. अशातच स्वानंदी बेर्डेचा एका मुलासोबतचा फोटो व्हायरल झाला होता. यावरून स्वानंदी बेर्डे प्रेमात पडली की काय? अशी चर्चा रंगली होती. यावर स्वानंदीची आई म्हणजे अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी झी 24 तासकडे  खुलासा केला आहे.

काय म्हणाल्या प्रिया बेर्डे?

स्वानंदी बेर्डे आणि प्रेम मोदी हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. नुकताच प्रेमचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाचे फोटो स्वानंदीने पोस्ट केले आहेत. मोदी कुटुंबिय आणि आमचे खूप चांगले संबंध आहेत. या दोघांनामध्ये फक्त मैत्री असल्याचं प्रिया बेर्डेंनी झी २४  तासला सांगितलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prem Modi (@premmodii)

काय होतं स्वानंदीच्या पोस्टमध्ये?

स्वानंदीने एका मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. या तरुणाचे नाव प्रेम मोदी आहे. या दोघांच्या नावाची चर्चा सुरू होती. स्वानंदी या पोस्टमध्ये म्हणलं होतं की,'तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यासाठी मी काहीही करू शकते. आयुष्यातील कठीण काळात आपण अधिक जवळ आलो. आता तुझी इतकी सवय झाली आहे की एकटीला भीती वाटते. खूप प्रेम.....'  मात्र आता प्रिया बेर्डे यांनी यावर खुलासा केला आहे

स्वानंदी बेर्डेने इंस्टाग्रामवरील ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर डिलीट केली आहे. त्यामुळे चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.   स्वानंदी भाऊ अभिनय बेर्डे प्रमाणेच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. पण त्या अगोदरच तिच्या खासगी आयुष्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.स्वानंदी सिनेसृष्टीत करणार पदार्पण स्वानंदी बेर्डे आणि सुमेध मुद्गलकर या जोडीचा 'मन येड्यागत झालं' हा सिनेमाही रसिकांसमोर येणार आहे. या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला ही फ्रेश जोडी दिसणार असल्याचं नुकतंच संदीप जोशी यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं. त्यामुळे या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. स्वानंदीसाठी हा पदार्पणाचा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. प्रेक्षक स्वानंदीच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

मागे

प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार KGF 2
प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार KGF 2

‘केजीएफ’ (K.G.F) या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा टीझर काही दिवसांपू....

अधिक वाचा

पुढे  

Urmila Matondkar B’day | उर्मिला मातोंडकरच्या करिअरवर जेव्हा राम गोपाल वर्मामुळे टाच आली
Urmila Matondkar B’day | उर्मिला मातोंडकरच्या करिअरवर जेव्हा राम गोपाल वर्मामुळे टाच आली

बॉलिवूडची अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) काही दिवसांपूर्वी राजकारण....

Read more