By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 11:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा दमदार प्रवास निश्चित करणारी बॉलिवूडची देसी गर्ल निक जोनास सोबत लग्नानंतर परदेसी गर्ल बनली आहे. तर, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जोधपूरमध्ये शाही लग्नसोहळा पार पडल्यानंतरही प्रियंका सतत चर्चेत असते. नुकतीच प्रियंका आपल्या भावाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल झालीय. यावेळी प्रियंकाचा एका पिवळ्या रंगाच्या शर्टातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. याचं कारण म्हणजे या फोटोत प्रियंकानं मंगळसूत्र परिधान केलेलं दिसतंय. प्रियंकाचा हा मंगळसूत्र लूक तिच्या फॅन्सना भलताच पसंत पडलाय. प्रियंका चोपडानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपला हा फोटो शेअर केलाय. प्रियंका मुंबई विमानतळावर पिवळ्या रंगाचा टॉप, काळा गॉगल आणि मंगळसूत्रासहीत दिसली.
६६व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची नावं लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर होण....
अधिक वाचा