By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2021 01:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा बर्याचदा चर्चेत असते. कायमच प्रियांका अत्यंत काळजीपूर्वक अनेक मोठं मोठ्या विषयांवर आपलं स्पष्ट मत देत असते. प्रियांका चोप्रा कॉफी विथ करणमध्ये दिसली होती. त्यामध्ये लेसबियनबद्दल प्रियांकाला एक प्रश्न विचारण्यात आला होता. आता तिचा हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये ती सांगत आहे की, एका महिलेने तिला कसं आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. जेणेकरुन ती तिच्याबरोबर रोमँटिक होईल. त्याचवेळी प्रियंका खोटं बोलली की, तिचा बॉयफ्रेंन्ड आहे आणि ती तसं करू शकत नाही.
प्रियंका म्हणाली की, 'एकदा तिला एका महिलेने प्रपोज केलं होतं. मात्र या परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी तिने मी रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. करण जोहरच्या शोमध्ये प्रियंकाने हे सगळं एका नाईट क्लबमध्ये घडल्याचं सांगितलं होतं.
प्रियांका या प्रकाराबद्दल बोलताना म्हणाली, 'मी तिला सांगितलं की, मी तशी अजिबात नाही. माझा बॉयफ्रेंन्ड आहे, तेव्हा माझा बॉयफ्रेंन्ड नव्हता ,तरी पण मी असं त्या मुलीला सांगितला. मी तिला असंही म्हणाले की, मला फक्त मुलंच आवडतात.
२०१४मध्ये प्रियंका चोप्रा कॉफी विथ करणमध्ये दिसली होती. त्यावेळचा तिचा हा व्हीडिओ खूप व्हायरल होत आहे. प्रियांका चोप्राला करण जोहरने विचारलं की, एखाद्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिने कधी एखाद्या दुसर्याला डेट केलं आहे का?, यावेळी प्रियांका चोप्रासोबत तिथे दीपिका पादुकोण देखील होती.
याशिवाय प्रियंकाने तिच्या 'अनफिनिश्ड
' या पुस्तकातही रोमँटिक रिलेशनशिपविषयी सांगितलं आहे. तिचा पती निक जोनास यांनीही कबूल केलं आहे की, त्याला प्रियंका चोप्राच्या रोमँटिक गोष्टी वाचायला खूप आवडतात. प्रियंका चोप्राने निक जोनासशी लग्न केलं आहे. सोशल मीडियावरही हे दोघं खूप अॅक्टिव्ह असतात.
त्याचबरोबर प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच 'शीला' चित्रपटात 'माँ आनंद शीला'ची भूमिका साकारताना दिसणार आहे. बॅरी लेव्हिनसन हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. 'शीला' चित्रपटात अभिनयाव्यतिरिक्त प्रियांका या सिनेमाची निर्मिती देखील करणार आहे.
गेल्या 20 आठवड्यांपासून सुरु असलेल्या बिग बॉसच्या 14 व्या मोसमाचा महाअंतिम स....
अधिक वाचा