ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रकुल प्रीत सिंहची एनसीबी कार्यालयात पोहोचली, ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी चौकशी

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2020 10:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

रकुल प्रीत सिंहची एनसीबी कार्यालयात पोहोचली, ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी चौकशी

शहर : मुंबई

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात नाव आलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh At NCB Office) आज एनसीबीसमोर हजर होणार आहे. एससीबीकडून आज तिची चौकशी केली जाणार आहे. एनसीबीने रकुल प्रीत सिंहला समन्स बजावला होता. मात्र, सुरुवातीला तिने समन्स मिळालाच नसल्याचा बहाणा देत टाळाटाळ केली. त्यानंतर तिने अखेर एनसीबीचे समन्स स्वीकारले आणि आज तिची चौकशीही केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता एनसीबी तिची चौकशी करणार आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोणची उद्या चौकशी होणार आहे (Rakul Preet Singh At NCB Office).फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटासह सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह यांना 24 सप्टेंबरला एनसीबीने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यापैकी सिमॉन खंबाटा त्याच दिवशी एनसीबी कार्यालयात दाखल झाली असून एनसीबीकडून तिची चौकशी करण्यात आली. तर आज रकुल प्रीत सिंहची चौकशी होत आहे.

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये एनसीबीने समन्स बजावल्यानंतर बड्या अभिनेत्रींचे धाबे दणाणले आहेत. सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण काल रात्री मुंबईत दाखल झाली. तिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आपण 26 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं कळवलं. आज दीपिकाची कोव्हिड टेस्ट होण्याचीही शक्यता आहे. टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर ती चौकशीला सामोरं जाण्याची शक्यता आहे.

दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंगही वकिलांची जुळवाजुळव करत आहे. त्याने एनसीबीला पत्र लिहून चौकशीदरम्यान सोबत राहण्याची परवानगी मागितली आहे. दीपिकाला डिप्रेशन आणि एन्झायटीचा त्रास असल्याचं कारण त्याने दिलं आहे. या प्रकरणी एनसीबी आज परवानगी देणार की नाही हे पाहावं लागणार आहे.

मागे

बॉलिवूडच्या प्रमुख अभिनेत्री ड्रग्ज प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात,कोट्यावधींची गुंतवणूक अडचणीत?
बॉलिवूडच्या प्रमुख अभिनेत्री ड्रग्ज प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात,कोट्यावधींची गुंतवणूक अडचणीत?

सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज अँगलसमोर आला. त्यानंतर रिया चक्रव....

अधिक वाचा

पुढे  

ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम काळाच्या पडद्याआड

भारतीय संगीत विश्वात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ गायक एस.पी.....

Read more