By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 03, 2019 03:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नुकताच राणू मंडल यांनी हिमेश रेशमिया यांच्या सोबत तिसरे गाणे रेकॉर्ड केले. त्यावेळी त्याची प्रतिमा पहिल्यापेक्षा अधिक खुललेली दिसत होती. हिमेश ने त्यांच्या कडून 'तेरी मेरी कहाणी' हे पहिले गाणे गाउन घेतले होते. प्रेक्षकांनी ह्या गाण्याला प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर 'आदत' हे गाणे गायले होते. आता त्यांनी तिसरे गाणे गायले आहे. 'आशिकी मे तेरी' ह्या तिसर्या गाण्यात त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसून येत आहे.
हिमेशने त्यांचा रेकॉर्डच्या वेळेचा एक विडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी स्वॅग प्रकारात गायले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेल्या राणू मंडल यांनी संगितले की "वारंवार विमानाने मुंबईला येणे त्रासिक आणि अवघड आहे. मी मुंबईतच राहण्याचा विचार करत आहे. मला मुंबईत घर घ्यायच आहे.