ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'ग्रॅमी नॉमिनेटेड ' अमेरिकन रॅपरची भरदिवसा हत्या

By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 01, 2019 04:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'ग्रॅमी नॉमिनेटेड ' अमेरिकन रॅपरची भरदिवसा  हत्या

शहर : विदेश

ग्रॅमी नॉमिनेटेड रॅपर निप्सी हसल याची रविवारी त्याच्या कपड्यांच्या स्टोअरसमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनं यूएस मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलाय. गायिका रेहाना, ड्रेक आणि इतर अनेक अमेरिकन सेलिब्रिटींनी या घटनेबद्दल शोक आणि राग व्यक्त केलाय. एवढी मोठी घटना कशी घडली आणि का घडली? याचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना लागलीय. निप्सी हा केवळ ३३ वर्षांचा होता.

यूएस पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निप्सी बाईक खरेदीसाठी ब्रोवार्ड काऊंटीमध्ये गेला असताना त्याची हत्या करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रॅपरवर मारेकऱ्यांनी अनेक गोळा झाडल्या. निप्सीला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, एव्हाना वेळ कधीच निघून गेली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या घटनेनंतर, याचा काय अर्थ? माझा आत्मा हादरलाय. निप्सीच्या आत्म्याला शांती मिळो... निप्सी तू खूप चांगला माणूस होतास, असं ट्विट गायिका रेहाना हिनं केलंय.

मागे

प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेलवर फसवणुकीचा आरोप
प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेलवर फसवणुकीचा आरोप

निर्माता अजय कुमार सिंह यांनी अमिषा पटेल आणि तिचा बिझनेस पार्टनर कुणाल यां....

अधिक वाचा

पुढे  

“पीएम नरेंद्र मोदी” प्रदर्शनाचा मार्ग मोकळा,५ एप्रिलला होणार  प्रदर्शीत
“पीएम नरेंद्र मोदी” प्रदर्शनाचा मार्ग मोकळा,५ एप्रिलला होणार प्रदर्शीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘पीएम नरेंद्र म....

Read more