ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राञीस खेळ चाले मधल्या अण्णांनी भूमिकेसाठी घेतली अशी मेहनत

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 05:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राञीस खेळ चाले मधल्या अण्णांनी भूमिकेसाठी घेतली अशी मेहनत

शहर : मुंबई

रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या सिझनमध्ये अण्णांची भूमिका फार छोटी होती. निर्मात्यांच्या आग्रहाखातर ही भूमिका केल्याचं ते सांगतात. पण आता दुसऱ्या सिझनमध्ये ते प्रमुख भूमिकेत आहेत. ही भूमिका साकारणं म्हणजे खूप मोठं आव्हान होतं असंही ते म्हणाले.

खंरतर अण्णांच्या भूमिकेसाठी एका महिन्यात त्यांनी सात ते आठ किलो वजन कमी केलं होतं. यादरम्यान त्यांनी कडक डाएट प्लॅन आखला होता. तर मालवणी भाषेबद्दल ते म्हणाले, माझी काकू गावी कणकवलीत मालवणी भाषेत बोलायची. त्यामुळे ती भाषा मी चांगलीच ऐकून होतो. पण बरीच वर्षे पुण्यात राहिल्याने मला ती भाषा व्यवस्थित बोलता येत नव्हती. त्यामुळे जवळपास एक महिनाभर मला त्या भाषेचा सराव करावा लागला. त्यासाठी मी ऑनलाइन मालवणी नाटकं पाहायचो.

ऑनस्क्रीन अण्णांच्या भूमिकेपेक्षा ऑफस्क्रीन माधव हे पूर्णपणे वेगळे असल्याचं ते सांगतात. मी खऱ्या आयुष्यात माझ्या भूमिकेच्या एकदम विरोधात आहे. मी भावनिक व्यक्ती आहे. अण्णांना नाती जपता येत नाहीत पण खऱ्या आयुष्यात माझ्यासाठी नाती फार महत्त्वाची आहेत.

पहिल्या एपिसोडपासूनच माधव यांना अण्णांच्या भूमिकेसाठी कौतुकाची थाप तर काही टीकाटिप्पणीसुद्धा मिळाली. पण एका अडीच वर्षाच्या मुलाने त्यांना रॉकिंग अण्णाअसं नाव दिलं होतं आणि त्या मुलाचं हे नावं माधव यांना फारच आवडलं होतं. आजही सेटवर लहान मुलं माझ्यासोबत आवडीने सेल्फी काढतात, पण मोठी माणसं अनेकदा माझ्या ऑनस्क्रीन भूमिकेच्या दरारामुळे जवळ यायला घाबरतात, असं त्यांनी सांगितलं.

मागे

'आयर्न मॅन' 'पॅडमॅन' सेम सेम...
'आयर्न मॅन' 'पॅडमॅन' सेम सेम...

अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेमने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. बॉलिवूडचे से....

अधिक वाचा

पुढे  

बे्रस्ट कॅन्सरमुळे अशी झाली होती आयुष्मान खुरानाच्या बायकोची अवस्था
बे्रस्ट कॅन्सरमुळे अशी झाली होती आयुष्मान खुरानाच्या बायकोची अवस्था

ताहिरा आणि आयुष्मान हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. कॉलेजमधलं प्रेम उत्....

Read more