ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘छोटा अमिताभ’ मोठ्या व्यवसायाचा मालक, थेट 300 कोटींची उलाढाल!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 24, 2020 10:16 AM 2019-02-12T14:15:30+5:30

‘छोटा अमिताभ’ मोठ्या व्यवसायाचा मालक, थेट 300 कोटींची उलाढाल!

शहर : मुंबई

मनोरंजन विश्वाचा ‘महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळावे, अशी सगळ्या कलाकारांची किंबहुना मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असते. अनेक मोठे निर्माते-दिग्दर्शक-लेखक खास अमिताभ बच्चन यांना समोर ठेवून एखाद्या चित्रपटाची संहिता लिहितात. ‘केबीसीच्या मंचावर सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी खऱ्या आयुष्यातही अनेकांना मदतीचा हात दिला आहे. चित्रपटसृष्टीत स्वतःचे हक्काचे स्थान मिळवत रसिकांच्या मनात घर करणाऱ्या ‘बिग बींन प्रमाणे, ‘छोट्या बिग बींनी (little Amitabh)  देखील मेहनतीने स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. एकेकाळी बाल ‘अमिताभ साकारणारा अभिनेता रवी वलेचा (Ravi valecha) आज तब्बल 300 कोटींचा मालक बनला आहे.

सत्तर-ऐंशीच्या दशकांत चित्रपटांची कथा ही नायकाच्या जन्मापासून किंवा त्याच्या बालपणापासून सुरू व्हायची. कष्टप्रद, संघर्षमय आयुष्य जगणारा हा नायक, मोठा होऊन काहीतरी विशेष करून दाखवायचा. चित्रपटाची कथाच भासावी असा बदल एका बालकलाकाराच्या आयुष्यातदेखील झाला. मोठ्या पडद्यावर ‘छोटा अमिताभ साकारणारा अभिनेता रवी वलेचा आता एका मोठ्या कंपनीचा मालक बनला आहे.

अभिनेते रवी वलेचा यांनी अनेक चित्रपटात ‘बाल अमिताभ म्हणून काम केले आहे. 1976मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फकीरा या चित्रपटातून रवीने मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. ‘अमर अकबर अँथोनी या चित्रपटाने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. बघताच क्षणी लहानग्या अमिताभ प्रमाणे भासणाऱ्या रवीने ‘देश प्रेमी, ‘शक्ती, ‘कूली, ‘अमर अकबर अँथोनी सारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये अमिताभची व्यक्तिरेखा साकारली होती. तब्बल 300हून अधिक चित्रपटांत बालकलाकाराची भूमिका करणाऱ्या रवीने त्याचवेळी मनोरंजन क्षेत्राला रामराम म्हटले.

अभिनय सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित!

रवीने अभिनय सोडून आपला अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. पुढे जाऊन त्यांनी व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला.  कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर रवी यशस्वी उद्योजक बनला आहे.  त्याने अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूटमधून एमबीएची पदवी घेतली. त्यानंतर स्वत:ची कंपनीदेखील सुरू केली. हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात त्यांनी बरेच नाव कमावले आहे.

                                                                              

अभिनय क्षेत्रात यश मिळत असतानाच त्यांनी अभ्यासासाठी त्या क्षेत्राचा त्याग करण्याचा निर्णय घेतला होता. व्यवसाय उभा करतानाही त्यांना इतरांप्रमाणेच संघर्ष करावा लागला होता. परंतु, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी सगळ्या अडथळ्यांवर मात केली. या व्यवसायामुळेच ते आज तब्बल 300 कोटींचे मालक बनले आहेत. मनोरंजन क्षेत्राच्या झगमगाटीने हुरळून जाणऱ्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे.

मागे

‘लक्ष्मी बॉम्ब’ पुन्हा वादात, चित्रपटाचे नाव बदलण्याच्या मागणीला जोर!
‘लक्ष्मी बॉम्ब’ पुन्हा वादात, चित्रपटाचे नाव बदलण्याच्या मागणीला जोर!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Akshay Kumar Laxmmi Bomb) ....

अधिक वाचा

पुढे  

मी केवळ व्हिसा मिळवण्यासाठी बेनेडिक्टशी लग्न केलं : राधिका आपटे
मी केवळ व्हिसा मिळवण्यासाठी बेनेडिक्टशी लग्न केलं : राधिका आपटे

अभिनेत्री राधिका आपटे हिने 2012 मध्ये ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग....

Read more