By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 04, 2020 11:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बॉलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूतने १४ जूनला आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून मुंबई पोलीस याचा तपास करतायत. तर दुसरीकडे सुशांतच्या परिवारातर्फे रिया चक्रवर्तीविरोधात पटणा येथे एफआयआर दाखल करण्यात आला. यानंतर बिहारची एक टीम मुंबईत तपासासाठी आली. पण या दरम्यान रियाशी कोणताच संपर्क झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी एक स्टेटमेंट जाहीर केलंय. त्यानुसार १४ जून २०२० ला रिया मुंबईतच होती. तिला सुशांतच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्याची परवानगी नव्हती. कारण २० जणांच्या यादीत तिचं नाव नव्हतं. तिला मुंबई पोलिसांनी १८ जूनला वांद्रे पोलीस स्थानकात बोलवलं. तिथे तिचे स्टेटमेंट लिहून घेण्यात आलं. यानंतर १८ जुलैला सांताक्रूझ पोलीस स्थानकात तिला हजर राहण्यास सांगितलं. तिथे देखील तिने आपलं स्टेटमेंट दिलं.
बिहार पोलीस पटणामध्ये दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे मुंबईत तपासासाठी आली. तेव्हा रियाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. कायदेशीररित्या ही केस मुंबई पोलिसांच्या अख्त्यारित आहे. बिहार पोलिसांकडे याचा तपास करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याचे रियाने आपल्या वकिलास सांगितले.
ईडीने गेल्या आठवड्यात बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी झाली. एफआयआरमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी आरोप केला आहे की, रिया चक्रवर्ती Rhea Chakraborty आणि तिच्या कुटुंबीयांनी सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर तिवारी यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत बिहार पोलीसांचं पथक या प्रकरणाच्या तपासासाठी दाखल झालं. पण सुशांतच्या अकाऊंटमधून रिया किंवा तिच्या भावाच्या खात्यात एक रुपयाही आला नसल्याचं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्पष्ट केलंय.
सुशात सिंह राजपूतशी संबंधित दोन कंपन्या आणि रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शोविक यांचा समावेश असलेल्या काही आर्थिक व्यवहारांच्या प्रकरणांवरही ईडीची नजर आहे. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ज्यांची नावं आहेत अशा आरोपींविरुद्ध ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. यात रिया चक्रवर्ती, तिचं कुटुंब आणि इतर सहा नावं आहेत. मुंबई पोलीस तसंच बिहार पोलिसांकडूनही सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी तपास सुरु आहे. पोलीस तपासातून दररोज अनेक नव्या गोष्टी समोर आहेत.
गुगलच्या मदतीनं स्वत:चं नाव, दिशाचं नाव आणि मानसिक आजारांविषयीची माहिती शोधणाऱ्या सुशांतच्या मनात त्यावेळी नेमके कोणते विचार सुरु होते ही बाब अद्यापही अस्पष्ट. पण, त्याच्या मनात मात्र असंख्य विचार आणि भावनांचा काहूर होता, ज्यामुळं त्यानं धस्का घेतला होता ही बाब समोर येत आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांची लेटेस्ट कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. बिग बी क....
अधिक वाचा