ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आधी ईडी, नंतर सीबीआय, आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची एन्ट्री, तिन्ही तपास यंत्रणांच्या रडारवर रिया

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2020 10:35 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आधी ईडी, नंतर सीबीआय, आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची एन्ट्री, तिन्ही तपास यंत्रणांच्या रडारवर रिया

शहर : मुंबई

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय तपासाचा गुरुवारी (27 ऑगस्ट) सातवा दिवस होता. मात्र, याप्रकरणी आता फक्त सीबीआयकडूनच तपास सुरु आहे, असं नाही. तर ईडीबरोबरच आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचीही एंट्री झाली आहे. कारण रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगमध्ये ड्रग्जचा अँगल समोर आला आहे. त्यामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्तीला तीन तपास यंत्रणांचा सामना करावा लागत आहे.

सुशांतच्या मृत्यूवरुन रडारवर असलेल्या रिया चक्रवर्तीच्या भोवती तीन तपास यंत्रणा आहेत. आधी ईडी नंतर सीबीआय आली आणि आता ड्रग्जचा अँगल समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची एंट्री झाली आहे. ईडी तपासात रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगवरुन ड्रग्ज अँगल समोर आला आहे. गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याशी MD ड्रग्जबद्दल रियानं चॅटिंगही केली होती. त्यामुळे आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) टीम मुंबईत दाखल झाली.

गोव्यात हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याची एनसीबीच्या टीमने चौकशीही केली आहे. रिया आणि गौरव यांच्यात 8 मार्च 2017 रोजी व्हाट्सअ‍ॅपवर ड्रग्जशी संबंधित चॅट झाल्याची माहिती समोर आली आहे. “हार्ड ड्रग्जबद्दल बोलायचं तर मी जास्त घेतलेले नाहीत. एकदा एमडीएमए घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे एमडी आहे का?”, असा प्रश्न रिया गौरवला चॅटमध्ये विचारत असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. रियानेच सुशांतची हत्या केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे.

सीबीआयने सातव्या दिवशी तब्बल 6 जणांची चौकशी केली आहे. रियाच्या कुटुंबातील सदस्य गुरुवारी पहिल्यांदाच सीबीआयसमोर हजर झाले. सीबीआयने केलेल्या 6 जणांच्या चौकशीमध्ये रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती,  सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, कूक केशव बिचनेर, कूर निरज सिंह, सुशांतचा आधीचा अकाऊंटट रजत मेवाती आणि माऊंड ब्लॅक इमारतीच्या सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे.

दुसरीकडे रियाला मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली आहे. एक पोलीस कर्मचारी रियाच्या इमारतीखाली सुरक्षेसाठी तैनात आहे. रियाने एक व्हिडिओ ट्विट करत सुरक्षेची मागणी केली होती. त्यानंतर काही मिनिटांतच मुंबई पोलिसांनी तिला सुरक्षा दिली. तर रियाच्या घरी पोलीस पोहोचल्यानंतर घराखाली एकच गोंधळ झाला. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी पोलिसांना घेरत त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.मनी लॉड्रिंग प्रकरणात तपास करणाऱ्या ईडीने रियाच्या वडिलांची चौकशी केली. रियाच्या वडिलांकडे रियाच्या लॉकरची चावी आणि काही कागदपत्रे आहेत. त्यामुळे इंद्रजित चक्रवर्ती यांना सांताक्रुझच्या वाकोल्यातील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेत पोलीस घेऊन आले.

एकाच वेळी तीन यंत्रणांचा वेगवेगवेगळ्या अँगलनं तपास सुरु आहे. तपास जसा खोलवर जातोय, तसे नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे यापुढेही आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते.

 

 

मागे

महेश मांजरेकर यांना ३० कोटींच्या खंडणीची धमकी, एकाला अटक
महेश मांजरेकर यांना ३० कोटींच्या खंडणीची धमकी, एकाला अटक

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांना ३० कोटी रुपये खंडणीसाठी धमकी मिळा....

अधिक वाचा

पुढे  

काय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनाला जाहीर आव्हान
काय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनाला जाहीर आव्हान

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, आहे असे ठणकावू....

Read more