By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 03:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सैराट चिञपटातून पदार्पण करणारी अभिनेञी रिंकू राजगुरूचा आगामी चिञपट कागरचा ट्रेलर रिलीज झालाय. या चिञपटात रिंकूसोबत अभिनेता शुभांकर तावडे महत्तवाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, येत्या 26 एप्रिलला हा चिञपट प्रदर्शित होणार आहे. तसेच, कागरच्या ट्रेलरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढलीय. तर, ग्रामीण राजकारणाचं वास्तवादी चिञ आपल्याला आता कागरमध्ये दिसेल. सैराटमधील आर्ची फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात लोकप्रिय झाली होती. त्यानंतर रिंकूने सैराटच्या कन्नड व्हर्जनमध्ये भूमीका केली होती. माञ, मराठीतला हा तिचा दुसरा सिनेमा असून कागरच्या माध्यमातून रिंकू राजगुरू मोठ्या पडद्यावर तीन वर्षानी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
लोकसभा निवडणूकांची सुरूवात ११ एप्रिलपासून झाली आहे. सर्वत्र निवडणूकींच्य....
अधिक वाचा