ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऋषि कपूर च्या चाहत्यांसाठी खुशखबर

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 06, 2019 02:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ऋषि कपूर च्या चाहत्यांसाठी खुशखबर

शहर : मुंबई

हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला प्रियकर असणार्‍या ऋषी कपूर यांच्यावर प्रेम करणार्‍या चाहत्यांसाठी  आनंदाची बातमी आहे. वाढदिवसानिमित्त मुंबईला घरी परत न आलेले ऋषि कपूर गणपती विसर्जन होईपर्यंत मुंबईला परतणार आहेत.अशी माहिती अभिनेते व ऋषि कपूर यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी शेअर केली आहे. ऋषि कपूर यांचा वाढदिवस 4 सप्टेंबरला होता.

त्याआधी असा अंदाज बांधला जात होता की, कित्येक महीने घरापासून लांब असलेले ऋषि कपूर ह्या वर्षी आपला वाढदिवस मुंबईतील आपल्या घरी कुटुंबासमवेत साजरा करतील. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाला, ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की हा फोटो भारत सोडून अमेरिकेतून निघताना ऋषी कपूर आणि त्याची पत्नी नीतू कपूर यांचा आहे.

नंतर ही वस्तुस्थिती खरी ठरली नाही, त्यानंतर त्याचे चाहते बरेच निराश झाले. या फोटो आणि व्हिडिओंबद्दल बोलताना रणधीर कपूर यांना हे खोट असल्याचे सांगितले होते. ऋषि कपूर अजूनही अमेरिकेत आहे आणि उपचार पूर्ण न केल्यामुळे वाढदिवशी घरी परत येऊ शकला नाही.

रणधीर कपूर यांनीही ही बातमी दिली की ऋषी कपूर 10 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत, म्हणजेच ते मुंबईत गणपती विसर्जनापूर्वी मुंबईत येणार आहेत. मात्र, यावेळी कपूर परिवाराने आरके स्टुडिओचमधील  गणपती  उत्सव थांबविला आहे.

ऋषी कपूर यांच्यावर गेल्या वर्षापासून न्यूयॉर्कमध्ये कर्करोगाचा उपचार सुरू होता. ते तिथे जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. यावेळी ते आपल्या आई कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्कारालाही पोहोचू शकले नाही.

मागे

श्रीदेवी आता मादाम तुसा मध्ये
श्रीदेवी आता मादाम तुसा मध्ये

'हवा हवाई' फेम प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हि चा पुतळा आता सिंगापूर च्या ....

अधिक वाचा

पुढे  

44 व्या टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-2019 मध्ये इंडिया पॅवेलियनचे उद्‌घाटन
44 व्या टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-2019 मध्ये इंडिया पॅवेलियनचे उद्‌घाटन

कॅनडातले भारताचे उच्चायुक्त विकास स्वरुप यांनी आज 44 व्या टोरंटो आंतरराष्ट....

Read more