By SEJAL PURWAR | प्रकाशित: ऑगस्ट 30, 2019 03:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला प्रभास आणि श्रद्धा कपुर चा मूवी ‘साहो’आज सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित झाला. या मूवीची बर्याच दिवसांपासून चर्चा चालत असून हा बॉलीवुडमधील सगळ्यात महाग मूवीजमध्ये मोडला जात असल्याचे समोर येत आहे. हीरो आणि विलन चा ताळमेळ बसवून बनवलेला हा अॅक्शन व ट्विस्टने भरपूर असा हा मूवी आहे.
मूवीमध्ये प्रभासचे करेक्टर प्रेक्षकांना मोहून घेत आहे . विलनचे संपूर्ण साम्राज्य संपवण्याचे काम प्रभासने केलेले दिसत आहे. मूवीची सुरवात मुंबईमधील एका मोठ्या दरोडयावरुन झालेली आहे व पुढे हीच कथा अनेक शहरांना सोबत जोडत आहे.
प्रेक्षकांच्यानुसार सुरवातीपासूनच अॅक्शन सिक्युएंस सोबत प्रभासची एंट्री धमाकेदार दाखवलेली आहे. परंतु प्रभासचा रोल थोडा रहस्यमयी दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूवीची स्टोरी चांगली असूनही ‘बाहुबली’सारखा धमाका बॉक्सऑफिसवर करू शकणार नाही ,असे प्रेक्षकांचे मत आहे.
मूवी मध्ये श्रद्धा कपूर अत्यंत आकर्षक दिसत आहे ,परंतु तिच्या रोल मध्ये काही कमी असल्याचे दिसून येत आहे. मूवीमध्ये प्रभास आणि श्रद्धाची केमिस्ट्री अपूर्ण वाटत आहे. हीरो सोडून विलेनचा विचार केला तर विलेनचा रोलदेखील हलका हलका वाटत आहे . याबरोबरच अनेक गाणी मूवीमध्ये चुकीच्या ठिकाणी टाकलेले असल्याने ते मूवीला आणखी मोठी व लांब बनवत आहे. प्रेक्षकांवरती चित्रपटाचा काही विशेष प्रभाव दिसत नाही.
अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील केनवूड सोसायटी इमारतीच्या टेरेसवरुन उडी मा....
अधिक वाचा