ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बॉलिवूडचा दबंग सलमान लवकरच ’बाबा’ होणार!

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 02:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान लवकरच ’बाबा’ होणार!

शहर : मुंबई

बॉलिवूडचा दबंग सलमान खान लाखो चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. सरोगसीच्या माध्यमातून बाबा होणारा सलमान खान बॉलिवूडमधील पहिला अभिनेता नाही. कारण यापूर्वी शाहरुख खान, करण जोहर, एकता कपूर, सनी लियोनी, तुषार कपूर यांनी देखील सरोगसीच्या माध्यमातून पालक झाले आहेत. सध्या सलमान खान 53 वर्षाचा आहे. ’ईद’च्या दिवशी सलमानचा आगामी बिग बजेट आणि बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत कटरीना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याच लाखो चाहत्यांकडून दबंग खानला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की, सलमान लग्न कधी करणार?.
मात्र आतापर्यंत या प्रश्नाचे उत्तर कोणालच मिळालेले नाही. मात्र निराश होऊ नका, सलमानच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण सलमान लग्न कधी करणार हे माहित नाही मात्र लवकरच बाबा होण्याचा विचार करत आहे.  लग्न न करता बाबा होणार आहे म्हटल्यावर सर्वांच्या भुवया उंचवल्या असतील हे नक्की आहे. पडद्यामागची कहाणी मात्र वेगळी आहे. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खान सरोगेसीच्या माध्यमातून बाबा होण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. 
सलमान खानला लहान मुले किती आवडतात ही गोष्ट आतापर्यंत कोणापासून लपलेली नाही. सलमानची मुलांशी जवळीकता अनेक कार्यक्रमात पाहायला मिळाली आहे. तसेच त्याची बहीण अर्पिताच्या मुलासोबत फोटो व व्हिडिओ सलमान खान सोशल मीडियावर शेअर करत असतो.   

मागे

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

टीव्ही अभिनेता प्रतीश वोरा यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू ....

अधिक वाचा

पुढे  

अ‍ॅव्हेंजर्सच्या टीममध्ये मोदींची एंट्री; सोशल मीडियावर धुमाकूळ
अ‍ॅव्हेंजर्सच्या टीममध्ये मोदींची एंट्री; सोशल मीडियावर धुमाकूळ

तेजस्वी सूर्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रियल हिरो म्हटलं आहे. त्यां....

Read more