By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 02:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आज म्हणजे २७ डिसेंबर रोजी ५४ वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा करत असताना सलमानच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सलमानची बहिण अर्पित खानला कन्यारत्न झाला आहे. संपूर्ण खान कुटुंबीय नव्या पाहुणीच्या येण्याने आनंदात आहे.
अर्पिताला आज सकाळी ८च्या सुमारास हिंदुजा रुग्णालयाता दाखल करण्यात आले होते. आता तिने मुलीला जन्म दिला असल्याचे समोर आले आहे. यावेळी अर्पिताचा पती आयुष शर्मा आणि इतर कुटुंबीय रुग्णालयात हजर आहेत.
सलमानने अर्पिता गर्भवती असल्यामुळे त्याचा वाढदिवस पनवेल येथील फार्म हाऊसवर साजर करण्याऐवजी भाऊ सोहेल खानच्या मुंबईमधील वांद्रे येथील घरी साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. कारण सलमनाने त्याचा वाढदिवस तिच्या मुलांसोबत साजरा करावा अशी अर्पिताची इच्छा होती. त्यामुळे सलमान कुठेही न जाता त्याचा वाढदिवस घरीच साजरा करत आहे.
आपल्या अभिनयाच्या स्टाइलने तसेच पिळदार शरीरयष्टीमुळे लाखो चाहत....
अधिक वाचा