ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'सांग सांग भोलानाथ पैसा मिळेल का?' होर्डिंग्स मागचं गुपीत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2019 01:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'सांग सांग भोलानाथ पैसा मिळेल का?' होर्डिंग्स मागचं गुपीत

शहर : मुंबई

गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी 'सांग सांग भोलानाथ पैसा मिळेल का?' असे होर्डिंग्ज नागरिकांचं लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे लोकांमध्ये होर्डिंग्सविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. हे होर्डिंग्स नक्की कशाचे आहे. याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता. हे होर्डिंग कोणत्या जाहिरातीचं आहे की अजून कोणत्या दुसऱ्या गोष्टीचं आहे. याबाबतचा खुलासा अखेर झाला आहे.बस स्टँडपासून प्लाय ओव्हरपर्य़ंत सगळ्य़ाच ठिकाणी सांग सांग भोलानाथ पैसा मिळेल का? असे बॅनर पाहायला मिळत होते. हे होर्डिंग्स सिनेमाच्या प्रमोशनचे होते. ये रे ये रे पैसा या सिनेमाचं वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी मराठीवर करण्यात आलं. ये रे ये रे पैसा' हा मराठी चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता.

दिग्दर्शक संजय जाधव यांच्या ये रे ये रे पैसा चित्रपटात तेजस्विनी पंडीत, उमेश कामत, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव यांची मुख्य भूमिका होती. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हिंदीनंतर मराठी पहिल्यांदाच असा कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांनी अनुभवला.अंधेरीत फ्लायओव्हरवर या सिनेमाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरचं अनोख्या प्रकारे प्रमोशन करण्यात आलं. ज्यामध्ये एका गाडीतून नोटा पडचताना दिसत आहे.

मागे

वादग्रस्त ट्विट प्रकरणी अखेर विवेक ओबेरॉयचा माफीनामा
वादग्रस्त ट्विट प्रकरणी अखेर विवेक ओबेरॉयचा माफीनामा

एक्झिट पोल, ओपिनियन पोल आणि निकाल यातील फरक स्पष्ट करण्यासाठी म्हणून अबिने....

अधिक वाचा

पुढे  

भारतीय चित्रपट विश्वाविषयी आम्हाला फार माहिती नाही; ऑस्करच्या अध्यक्षांची कबुली
भारतीय चित्रपट विश्वाविषयी आम्हाला फार माहिती नाही; ऑस्करच्या अध्यक्षांची कबुली

ऑस्कर अकादमी अर्थात 'अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्ट्स अँड सायन्स'च्या अध्....

Read more