ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

संजय दत्त दिग्दर्शकाच्या भूमिकेत...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

संजय दत्त दिग्दर्शकाच्या भूमिकेत...

शहर : मुंबई

द क्वीन ऑफ झांशी या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री कंगना रणौतने दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर आता अभिनेता संजय दत्तदेखील चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर ही कलाकार मंडळी दिग्दर्शकीय क्षेत्रात नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. एका मुलाखतीमध्ये संजय दत्त चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं समोर आलं आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्त मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटानंतर पानीपत, प्रस्थानम आणि शमशेरा या साऱ्या चित्रपटामध्येदेखील तो झळकणार आहे. त्यामुळे सध्या संजय दत्तचं शेड्युल पूर्णपणे व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. या व्यस्त कामाकाजातूनही वेळ काढत तो एका चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. मात्र अद्याप या चित्रपटाविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. संजय दत्त त्याच्या निर्मिती संस्थेअंतर्गत या नव्या चित्रपटाची निर्मिती करणार असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. हा चित्रपट ऐतिहासिक कथानकावर आधारित असून या चित्रपटातून माझ्या पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. संजयने सांगितले आहे.

मागे

निवडणुकीच्या धामधुमीत रिंकू राजगुरुच्या कागरचा दमदार ट्रेलर रिलीज...
निवडणुकीच्या धामधुमीत रिंकू राजगुरुच्या कागरचा दमदार ट्रेलर रिलीज...

सैराट चिञपटातून पदार्पण करणारी अभिनेञी रिंकू राजगुरूचा आगामी चिञपट कागरच....

अधिक वाचा

पुढे  

महेश भट्ट यांनी फेकून मारली चप्पल,कंगणाच्या बहिणीचा खळबळजनक खुलासा
महेश भट्ट यांनी फेकून मारली चप्पल,कंगणाच्या बहिणीचा खळबळजनक खुलासा

हिंदी सिनेसृष्टीत येण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रानौतला प्रचंड मेहन....

Read more