By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 25, 2019 07:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांनी लोकसभेचे उमेदवार देखील जाहीर केले आहे. त्यात आता बहिण प्रिया दत्त यांच्यापाठोपाठ आता अभिनेता संजय दत्तदेखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे वृत्त होते. मात्र याबाबतचा खुलासा खुद्द संजय दत्तने सोशल मीडियावर केला आहे. त्याने ही निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.
अभिनेता संजय दत्त उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र संजय दत्तने लोकसभा निवडणुक मी लढवणार असल्याच्या वृत्तात अजिबात तथ्य नसल्याचे सांगितले. त्याने ट्विट करत हे सांगितले. त्याने ट्विट केले की, 'माझ्याबद्दल सध्या लोकसभा निवडणुकीबाबत अफवा पसरवली जात आहे. मी लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे वृत्त खोटे आहे. मी देशासाठी समर्पित आहे आणि माझी बहिण प्रिया दत्तला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. मी विनंती करतो की आपल्या देशासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावा.'
संजय दत्तने २००९ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. राज्यसभा खासदार अमर सिंह यांच्या आग्रहामुळे संजय यांनी 'सपा'मध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी संजय दत्तने लखनौ येथून निवडणूक लढविण्याची घोषणा देखील केली होती. परंतु संजय दत्त त्यावेळी निवडणूक लढवू शकले नाही. संजय दत्त यांचे कुटुंबीय काँग्रेसचे आहेत. बहिण प्रिया दत्त यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
बॉलिवूडमध्ये अनेक थोर व्यक्तिंवर बायोपिक साकारण्याची तयारी सुरू आहे. अन....
अधिक वाचा