ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवाजी महाराजांचे सौरभ गोखलेने मानले आभार

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 23, 2019 07:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवाजी महाराजांचे सौरभ गोखलेने मानले आभार

शहर : मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सौरभ गोखलेने शिवाजी महाराजांचे आभार मानले आहेत. इतकेच नाही तर त्याने शिवाजी महाराजांच्या गेटअपमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सौरभ गोखले याने सोशल मीडियावर स्वतःचा शिवाजी महाराजांच्या गेटअपमधील फोटो शेअर करीत म्हटले की, अंगावर चढवलेला हा पोशाख म्हणजे विश्वास, पराक्रम, जबाबदारी, साहस, शालीनता, संयम, न्याय अशा नानाविध गुणांचे परिमाण ठरतो. कारण हा पोशाख म्हणजे आमची अस्मिता आहे, माझ्या महाराजांच्या विचारांची, आचारांची, लौकीकतेची, पराक्रमाची साक्ष देणारा आहे. हा पोशाख परिधान करायला मिळणं हे कृतकृत्य होण्यासारखेच आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार वंदन करून कृतज्ञता व्यक्त करतो आहे. महाराज आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. आज गडावर हर्ष दाटला होतो जयजयकार, शिवनेरीवर सूर्य जन्मला अन मिटला अंधार, हिंदुत्वाची कास धरोनि केली रणनीती, धर्मरक्षणा जणू घेतला रुद्राने अवतार, जय भवानी जय शिवराय !!

अभिनेता सौरभ गोखले याने छोट्या व मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडली आहे. श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. विविध मालिकांमध्ये त्याने दर्जेदार भूमिका साकारल्या. यानंतर मराठी सिनेमा आणि रंगभूमीवरसुद्धा त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली. याच अभिनयाच्या जोरावर सौरभने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रोहित शेट्टी दिग्दर्शित व रणवीर सिंग अभिनीत सिम्बा चित्रपटात सौरभ निगेटिव्ह भूमिकेत झळकला होता. या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

मागे

संजय दत्तने लोकसभेच्या उमेदवारीबाबत केला खुलासा
संजय दत्तने लोकसभेच्या उमेदवारीबाबत केला खुलासा

देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांनी....

अधिक वाचा

पुढे  

सागर देशमुखसमोर आता नवं आव्हान
सागर देशमुखसमोर आता नवं आव्हान

भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडक....

Read more