By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2019 04:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री मौसमी चटर्जी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मौसमी यांची 45 वर्षीय मुलगी पायल हिचं निधन झालं आहे. 14 डिसेंबर रोजी पायलचं निधन झालं. 2017 पासून पायल जुवेनाइल डायबिटीस म्हणजे टाईप 1 चा टायबिटीसवर उपचार घेत होती. 2018 पासून पायल कोमात होती.
मुलीच्या निधनानंतर मौसमी चॅटर्जी यांनी जावयावर आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप लावले आहेत. त्यावेळी त्यांनी आपला जावई मुलीची नीट काळजी घेत नसल्याचा आरोप केला होता. आता त्यांनी जावयाविरोद्ध तक्रार दाखल केली आहे.
मौसमी यांनी 2010 साली पायल यांच बिझनेसमन डिकी सिन्हाशी लग्न लावून दिलं. मौसमी यांचे पती जयंत मुखर्जी, पायल आणि जावई एकाच कंपनीचे संस्थापक होते. 2016 मध्ये यांच्या वादाला सुरूवात झाली आणि अंतर वाढत गेले. आता मौसमी यांनी जावयावर आरोप लावला आहे की डिकी त्यांच्या मुलीचा नीट सांभाळ करत नव्हते.
दरम्यान, यावर जावयाने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे की,'माझी माझ्या पत्नीसोबत काहीच समस्या नव्हती. माझी पत्नी शेवटपर्यंत माझ्यासोबतच होती. माझ्यावर जो निष्काळजीपणाचा आरोप लावला गेलेला ती केस देखील मी जिंकलो आहे. मौसमी यांनी माझ्या पत्नीच्या निधनानंतर चेहरा देखील पाहिला नाही. एवढंच नव्हे तर त्या तिच्या अंत्यविधीत सहभागी देखील झाल्या नाहीत.'
मुंबई - काही व्यक्तींच्या सोबत असण्यानेही बऱ्याच असाध्य गोष....
अधिक वाचा