ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शाहरुख खानचे जबरा फॅन...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 02:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शाहरुख खानचे जबरा फॅन...

शहर : विदेश

शाहरुख खान हा बॉलिवूडचा बाहशहा म्हणून ओळखला जातो. या बादशहाचे जगभरात  कोट्यवधी चाहते आहे. शाहरुखची एक झलक पहायला मिळावी ही त्याच्या कित्येक चाहत्यांची इच्छा असते. यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्नही करत असतात. त्याच्या याच लोकप्रियतेचा प्रत्यय नुकताच चीनच्या विमानतळावर पाहायला मिळाला आहे. त्यामुळे केवळ भारतातच नाही तर चीनमध्ये देखील त्याची तितकीच लोकप्रियता असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे शाहरुखच्या चीनमधील चाहत्यांनी त्याचं खास पद्धतीने स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखचा झिरो हा चित्रपट दाखविला जाणारा होता. या चित्रपटाला भारतीय प्रेक्षकांची पसंती मिळाली नसली तरी चीनमध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थित राहण्यासाठी शाहरुख चीनमधील बीजिंगला पोहोचला. यावेळी शाहरुखला विमानतळावर पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला विमानतळावरच घेरलं. अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी त्याचे ऑटोग्राफही घेतले. इतकचं नाही तर काही चाहते तर त्याच्या नावाचे मोठे पोस्टर्स हातात घेऊन एअरपोर्टवर त्याची वाट पाहत उभे होते.

 

मागे

सलमानसाठी नव्हे ‘या’ कारणासाठी केलं भारत चित्रपटामध्ये काम – कतरिना कैफ
सलमानसाठी नव्हे ‘या’ कारणासाठी केलं भारत चित्रपटामध्ये काम – कतरिना कैफ

प्रियंका चोप्रा सलमान खानच्या आगामी भारत या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलिव....

अधिक वाचा

पुढे  

“कलंक” ची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई
“कलंक” ची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई

बहुचर्चित 'कलंक' अखेर १७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 'कलंक&....

Read more