ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेना प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकरनं थाटलं नवं कार्यालय, काय आहे किंमत?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 03, 2021 12:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेना प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकरनं थाटलं नवं कार्यालय, काय आहे किंमत?

शहर : मुंबई

हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आता नवीन ऑफिस सुरु केलं आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काही दिवसातच उर्मिला यांनी नवं ऑफिस खरेदी केलं आहे. कंगना रानौत विरुद्ध शिवसेना वादात उर्मिला यांनी उडी घेत कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामनाच्या संपादक आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उर्मिलाने शिवसेनेत प्रवेश केला होता.

उर्मिला मातोंडकर यांचं नवं कार्यालय लिंकिंग रोड खास वेस्ट परिसरात उभारण्यात आलंय. हे कार्यालय सहाव्या मजल्यावरुन असून, 1 हजार स्वेअर फूट जागेत आहे. या इमारतीत कार्यालयाचं भाडं महिना 5 ते 8 लाख रुपये असल्याची माहिती मिळतेय. उर्मिला यांचं हे कार्यालय तब्बल 3 कोटी 75 लाख रुपयांना घेतल्याची माहिती मिळतेय.

नव्या कार्यालयाबाबत उर्मिला मातोंडकर काय म्हणतात?

आपल्या नव्या कार्यालयाबाबत विरोधकांनी आणि काही माध्यमांनी चुकीची माहिती पसरवली, चुकीच्या बातम्या चालवल्याचं स्वत: उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केलाय. त्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात आपण अंधेरीच्या डी.एन. नगर भागातील आपला एक फ्लॅट विकल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याच पैशातून आपण हे कार्यालय खरेदी केल्याचं उर्मिला यांनी स्पष्ट केलंय. तसंच चुकीची माहिती पसरवणाऱ्यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले आहेत.