By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 01:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेता अक्षय कुमारने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखती घेतली आहे. या मुलाखतीमध्ये मोदींनी पहिल्यांदाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. अक्षय कुमार आणि मोदींच्या या मुलाखतीला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिलाय. परंतु अक्षयने घेतलेली ही मुलाखत दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थला फारशी भावली नसल्याचे दिसत आहे. दाक्षिणात्य स्टार सिद्धार्थने अक्षय कुमार आणि मोदींच्या मुलाखतीबाबत एक ट्विट केले आहे. अक्षय कुमार एक चांगला खलनायक आहे, परंतु खलनायक म्हणून त्याला कमी लेखले जाते असे त्याने ट्विट केले होते. सिद्धार्थचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. त्याला या ट्विटमधून नेमकं काय म्हणायचे आहे याचा निष्कर्ष अनेक चाहत्यांनी लावला आहे. अनेक चाहत्यांनी तर ‘याला एखादा चित्रपट द्या’ असे म्हणत सडेतोड उत्तर दिले आहे.
माव्र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा Avengers: Endgame हा २०१९ मधील सर्वात मोठा चित्र....
अधिक वाचा